Friday, June 20, 2025
Home कॅलेंडर शेवटी किंगच तो! मध्यरात्रीपासूनच ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी, पोलिसांना करावी लागतेय मोठी कसरत

शेवटी किंगच तो! मध्यरात्रीपासूनच ‘मन्नत’ बाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी, पोलिसांना करावी लागतेय मोठी कसरत 

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान चाहत्यांमध्ये त्याच्या अनोख्या स्टाईलसाठी प्रसिद्ध आहे. केवळ भारतातच नाही, तर देशाबाहेरही त्यांचे लाखो चाहते आहेत. ते अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी इतके आतूर असतात की, त्याच्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला नेहमीच भरभरून प्रेम देताना दिसतात. मग जर अभिनेत्याचा वाढदिवस असेल, तर ते कसे काय शांत राहू शकतात. मंगळवारी (२ नोव्हेंबर) शाहरुख ५६ वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त रात्रीपासून मन्नत बंगल्याबाहेर चाहत्यांनी मोठी गर्दी केली आहे.

पोलिसांना करावी लागली मोठी कसरत
मध्यरात्रीपासूनच शाहरुख खानचे घर मन्नत बाहेर हजारोंच्या संख्येने चाहते जमले होते. यावेळी अनेक लोक हातात पुष्पगुच्छ आणि बर्थडे कार्ड्स घेऊन आलेले पाहायला मिळाले. या दरम्यान मुंबई पोलिसांचे मात्र चांगलेच बारा वाजले. किंग खानच्या चाहत्यांना सांभाळण्यासाठी मुंबई पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. अभिनेत्याची केवळ एक झलक पाहण्यासाठी चाहते नियंत्रणाच्या बाहेर गेले होते. (shah rukh khan birthday huge crowd fans gathered outside mannat to see king khan)

खास आहे यावेळेसचा वाढदिवस
यावेळी शाहरुख खानचा वाढदिवस खूप खास आहे, कारण यावेळी आर्यन खान प्रकरणामुळे खान कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. अशातच अभिनेत्याच्या वाढदिवसाच्या अगदी काही दिवस अगोदरच मुलगा आर्यनला जामीन मिळाला आहे.

चाहते आहेत किंग खानचे साथी
शाहरुख खानचा वाढदिवसानिमित्त त्याच्यापेक्षा त्याचे चाहतेच जास्त उस्तुक दिसतात. शाहरुख खानचे चाहते हे त्याचे खरे साथी आहेत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण त्याच्या कठीण काळात त्याचे चाहते त्याच्या खांद्याला खांदा लावून उभे होते. ही गोष्ट आर्यन खान प्रकरणामध्ये तुमच्या लक्षात आलीच असेल.

‘असे’ मानेल चाहत्यांचे आभार
शाहरुख खान बाल्कनीत येतो आणि त्याच्या सर्व चाहत्यांचे आभार मानतो. प्रत्येक वेळी प्रमाणेच तो आपल्या कुटुंबासह घराच्या बाल्कनीत येईल आणि सर्वांचे आभार मानेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ कारणावरून झाला होता शाहरुख अन् सलमानमध्ये वाद, कॅटच्या वाढदिवशी हाणामारीपर्यंत पोहचली गोष्ट

-Video: वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शाहरुख खानच्या घरी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांची रेलचेल सुरू

-आर्यनसाठी शाहरुख आणि गौरीने घेतले दोन मोठे निर्णय; दिवाळीनंतर आर्यन जाणार ‘मन्नत’पासून लांब

हे देखील वाचा