आर्यनसाठी शाहरुख आणि गौरीने घेतले दोन मोठे निर्णय; दिवाळीनंतर आर्यन जाणार ‘मन्नत’पासून लांब

0
192
Photo Courtesy: Instagram/gaurikhan

नुकताच आर्यन खानला अं’मली पदार्थांच्या केसमध्ये जामीन मंजूर झाला आणि आर्यन त्याच्या घरी परतला. तब्बल २६ दिवस तुरुंगात राहून आर्यनला जामीन मिळाला आहे. या २६ दिवसांमध्ये आर्यन आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने खूपच टेन्शनमध्ये दिवस काढले आहेत. आता आर्यन घरी तर आला आहे, मात्र त्याला ११ मोठ्या अटींवर हा जामीन मिळाला आहे. त्यामुळे त्या अटींचे पालन करत आर्यनला या मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्याचे मोठे आव्हान शाहरुख आणि गौरीसमोर असणार आहे. यातच आता शाहरुख आणि गौरीने आर्यनसाठी काही निर्णय घेतले आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

प्राप्त माहितीनुसार, आर्यनला मीडियापासून लांब आणि सुरक्षित ठेवण्यासाठी शाहरुखने आर्यनसाठी एक वैयक्तिक बॉडीगार्ड ठेवण्याचे ठरवले आहे. शाहरुख खानसोबत २४*७ बॉडीगार्ड असतो. आर्यनसोबत झालेल्या या संपूर्ण घटनेमुळे शाहरुख पूर्ण हादरून गेला असून, त्याला असे वाटते की, जर आर्यनसोबत एक बॉडीगार्ड असता तर ही गोष्ट एवढी वाढलीच नसती. त्यामुळे आता शाहरुख आर्यनसाठी एक बॉडीगार्ड ठेवणार असल्याचे समजत आहे.

View this post on Instagram

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

याशिवाय दिवाळी झाली की शाहरुख आर्यनला त्याच्या अलिबागच्या फार्महाऊसवर पाठवणर आहे. शाहरुख आणि गौरीला वाटत आहे, की आर्यनने आता मीडियाच्या नजरेपासून लांब जाऊन संपूर्णपणे स्वतःवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, यासाठी त्याला अलिबागच्या फार्महाऊसवर पाठवले जाणार आहे. याठिकाणी राहून तो या घटनेतून बाहेर पडू शकतो. कारण आर्यन परवानगीशिवाय मुंबईसोडून जाऊ शकत नाही, आणि त्याचा पासपोर्ट जप्त केला आहे, त्यामुळे शाहरुखने त्याला अलिबागला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

View this post on Instagram

A post shared by Gauri Khan (@gaurikhan)

आर्यन या केसमध्ये अडकल्यानंतर शाहरुख त्याच्या चित्रपटाचे शूटिंग सोडून मुंबईत परतला. त्यामुळे टायच्या आगामी चित्रपटांचे शूटिंग मधेच थांबवण्यात आले आहे. शाहरुख मुंबईत दिवाळी साजरी करणार असून, त्यानंतर त्याचे संपूर्ण कुटुंब अलिबागला जाणार आहे, आणि तिथे ते आर्यनसोबत संपूर्ण नोव्हेंबर महिना व्यतीत करणार असून, डिसेंबरमध्ये तो त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगला पुन्हा सुरुवात करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ दिवशी रेशीमगाठीत अडकणार राजकुमार राव अन् पत्रलेखा, जाणून घ्या लग्नाची संपूर्ण माहिती

-आलिया- रणबीर अन् कॅटरिना- विकीच्या आधी राजकुमार अन् पत्रलेखा थाटणार आपला संसार; मित्रांना पाठवले निमंत्रण?

-राजकुमारच्या आईची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण; निधनानंतर अमिताभ यांनी अभिनेत्याला पाठवला होता व्हिडिओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here