Monday, April 6, 2026
Home साऊथ सिनेमा दुःखद! माजी मिस केरळ अंसी आणि उपविजेती अंजना यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत

दुःखद! माजी मिस केरळ अंसी आणि उपविजेती अंजना यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी अंत

मनोरंजन क्षेत्रातून एक दुःखद बातमी येत आहे. मिस केरळ २०१९ आणि साऊथ इंडिया २०२१ या स्पर्धेची विजेता असणारी अंसी कबीरचे रस्ता अपघातात निधन झाले आहे. अंसीसोबतच मिस केरळ २०१९ ची उपविजेता असणारी मॉडेल अंजना शाजनचेही निधन झाले आहे. सोमवारी (१ नोव्हेंबर) रोजी मोठ्या अपघातात या दोघांनीच निधन झाले. अपघातावेळी या दोघीही गाडीमध्ये होत्या. अंसी कबीर आणि अंजना शाजन या दोघींच्या मृत्यूच्या बातमीमुळे केरळच्या मनोरंजन विश्वात दुःखाची लाट पसरली आहे. प्राप्त माहितीनुसार, एका बाईक स्वराला वाचवत असतां त्यांच्या गाडीचा अपघात झाला.

अंसी कबीर आणि अंजना शाजन या दोघी एकाच गाडीतून तिरुवनंतपुरमहून एका प्रोजेक्टच्या निमित्ताने कोचीच्या दिशेने प्रवास करत होत्या. या प्रवासात जेव्हा त्यांची गाडी व्यटिला-पलरिवट्टोम हाइवेवर होती तेव्हा त्यांची गाडीची एका बाईकसोबत टक्कर झाली. या ट्क्करमुळे कारचा समतोल बिघडला आणि त्यामुळे ही गाडी एका झाडावर जोरात आदळली. या घटनेत कारचा पूर्णतः चकणाचुर झाला आहे. त्यामुळे गाडीला ओळखता देखील येत नव्हते.

पोलिसांच्या सांगण्यानुसार, अंसी आणि अंजना यांच्यासोबत अजून दोन पुरुष देखील गाडीत उपस्थित होते. त्या दोघांना देखील गंभीर स्वरूपाचा मार बसला आहे. या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. याच हॉस्पिटलमध्ये अंजना आणि अंसी यांचे पार्थिव शरीर ठेवण्यात आले आहे.

अंसी कबीरच्या मृत्यूनंतर तिची शेवटची सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल होत आहे. तिने नुकताच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये ती गवतावर फिरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “आता निघण्याची वेळ आली आहे.” त्याच्या या कॅप्शनमध्ये तिने लिहिलेली ओळ दुर्दैवाने खरी ठरल्यामुळे तिच्या फॅन्सला खूपच जास्त वाईट वाटत आहे. या क्शनमुळेच हा व्हिडिओ सर्वात जास्त चर्चेत आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुला उर्फीचा आजार चढलाय काय?’ विचित्र ड्रेसमुळे काजोल आली ट्रोलर्सच्या निशाण्यावर

-जेव्हा अजय देवगणने पहिल्या भेटीतच काजोलला केले होते रिजेक्ट, तिला पुन्हा भेटायची नव्हती त्याची इच्छा

-‘कमीत कमी मुलाला तरी सोडा’, म्हणत अबरामच्या मागे लागलेल्या फोटोग्राफर्सवर संतापले चाहते

हे देखील वाचा