Thursday, September 17, 2026
Home बॉलीवूड सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

सिल्व्हर रंगाच्या शिमरी गाऊनमधे करिश्मा कपूरचा घायाळ करणारा अंदाज पाहिला का?

दिवसेंदिवस सोशल मीडियाची लोकांमधील क्रेझ वाढतच चालली आहे. यात लहान काय मोठे काय सर्वच सोशल मीडियाच्या अधीन होताना दिसत आहे. कलाकरांना तर सोशल मीडियावर राहणे ही त्यांच्यासाठी काम मिळवण्याची एक प्रकारची अलिखित अटच आहे. कलाकार सोशल मीडियावर सतत काहींना काही पोस्ट करून फॅन्सच्या संपर्कात राहतात. सोशल मीडियामुळे अनेक नव्या जुन्या कलाकरांना व्यक्त होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. सोशल मीडियावर सध्याच्या घडीचा सर्वांत ट्रेंडिंग प्रकार म्हणजे ‘रील्स’.

अनेक कलाकार तात्यांचे विविध प्रकारचे रिल्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट करताना आपल्याला दिसतात. कधी कधी तर कलाकारांचे काही रिल्स इंटरनेटवर तुफान व्हायरल देखील होतात. बॉलिवूडमधील ९० च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री करिश्मा कपूर देखील सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमी तिचे फोटो, व्हिडिओ आणि रील्स पोस्ट करताना दिसते. नुकतेच करिश्माने तिचे एक रील शेअर केले आहे.

करिश्माने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती एका झटक्यात ड्रेस बदलून येते. व्हिडिओच्या सुरूवातीला गुलाबी रंगाच्या सिल्क बाथरोबमध्ये दिसणारी करिश्मा पडदा सरकवला सारखी स्क्रीन सरकवते आणि नंतर तिचा दिसणारा ग्लॅमरस अवतार सर्वांच्या नजरा खिळवून ठेवतो. करिश्माच्या दुसऱ्या अवतारामध्ये ती सिल्वर रंगाच्या गाऊनमधे दिसते. तिचा हा लूक पाहून आजही सर्व तिच्या प्रेमात पडतील इतकी मोहक ती यात दिसत आहे. तिच्या या गाऊनमधे तिची स्लिम बॉडी अधिक उठून येत आहे. या गाऊनवर तिने लांब कानातले घातले असून केस एकाबाजूला भांग पाडत मोकळे सोडले आहे. तिचा हा लूक पाहून नेटकरी घायाळ झाले आहेत. तिच्या या शिमरी फ्लोरलेंथ गाऊनमधे लो-कट नेकलाइनसोबतच स्ट्रेप स्लीव्स दिसत असून, भावना रावने डिझाइन केलेल्या या गाऊनमध्ये करिश्मा खूपच सुंदर दिसत आहे.

हा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओवर फॅन्सच्या असंख्य कमेंट्स, आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे. वयाच्या ४७ व्या वर्षी देखील करिश्माने सौंदर्य अबाधित आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-केवळ हजार रुपये घेऊन गौरीच्या शोधात मुंबईत आला होता शाहरुख, तर आज वर्षाला कमावतो ‘इतके’ कोटी

-जेव्हा करण जोहरने विचारला होता ‘न्यूड पोझ’बाबत प्रश्न, शाहरुख खानचे उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल हैराण

-खरंच की काय! अभिनयामुळे नव्हे, तर नाकामुळे मिळाला होता ‘किंग खान’ला पहिला चित्रपट

हे देखील वाचा