Sunday, September 20, 2026
Home बॉलीवूड आलिया भट्टच्या चित्रपटाची नवी रिलीझ डेट आली समोर, ‘या’ दिवशी पडद्यावर येणार ‘गंगूबाई काठियावाडी’

आलिया भट्टच्या चित्रपटाची नवी रिलीझ डेट आली समोर, ‘या’ दिवशी पडद्यावर येणार ‘गंगूबाई काठियावाडी’

बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी दिग्दर्शित आणि अभिनेत्री आलिया भट्ट अभिनित ‘गंगूबाई काठियावाडी’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. चित्रपटाची नवीन रिलीझ डेट जाहीर झाली आहे. आलिया भट्टचा हा चित्रपट आता १८ फेब्रुवारी २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ आणि ‘आरआरआर’ यांच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे. आलिया भट्ट या दोन्ही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होता आणि आता या चित्रपटाचे सर्व काम पूर्ण झाले आहे. टीमने मुंबईतील फिल्मसिटी (गोरेगाव) मध्ये उर्वरित शूटिंग पूर्ण केले आहे. चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट आणि चित्रपटातील इतर स्टारकास्टला कोरोना झाला होता आणि त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग पूर्ण होण्यासही वेळ लागला होता.

आलिया या चित्रपटात गंगूबाईची भूमिका साकारत आहे. आलिया चित्रपटांमध्ये दमदार व्यक्तिरेखा साकारत असली, तरी ती पहिल्यांदाच डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याने वादाला तोंड दिले आहे. मानहानीच्या प्रकरणात मुंबई न्यायालयाने भन्साळी, चित्रपटाची आघाडीची अभिनेत्री आलिया भट्ट आणि लेखिका यांना समन्स बजावले होते.

गंगूबाई ही व्यक्तिरेखा प्रसिद्ध लेखक हुसेन जैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’ या पुस्तकातील एका प्रकरणावरून प्रेरित आहे. १९६० च्या दशकात कामाठीपुरातील सर्वात शक्तिशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक, गंगूबाई खूप लोकप्रिय आणि आदरणीय होत्या.

आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ‘गंगूबाई काठियावाडी’ व्यतिरिक्त ती ‘आरआरआर’ चित्रपटात दिसणार आहे. तिने सोशल मीडियावर फर्स्ट लूक देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. याशिवाय ती रणबीर कपूरसोबत ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. रणबीर कपूर आणि आलियाला पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या

-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद

-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी

हे देखील वाचा