सध्याच्या धकाधकीच्या काळात फिटनेसची आवश्यकता सर्वांनाच आहे. त्यामुळे सामान्य व्यक्तींपासून ते मोठ-मोठ्या कलाकारांपर्यंत सर्वजण आपल्या फिटनेसची काळजी घेताना दिसतात. बॉलिवूडमध्येही फिटनेस फ्रीक कलाकारांचा भरणार भरला आहे. यामध्ये अभिनेत्री इलियाना डिक्रूजच्या नावाचाही समावेश आहे. इलियाना स्वत:ला फिट ठेवण्यासाठी भरपूर मेहनत करत असते. ती सोशल मीडियावरही नेहमीच फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. अशातच इलियानाच्या ट्रेनरने तिला असे काही म्हटले आहे की, त्यामुळे अभिनेत्री जोरजोरात रडू लागली. तिने ही घटना आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
ट्रेनरचे बोलणे ऐकून रडू लागली इलियाना
इलियानाने इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यामध्ये तिने सांगितले की, तिच्या ट्रेनरने तिला अशा काही गोष्टी सांगितल्या, ज्या ऐकून ती रडली. अभिनेत्रीने वर्कआउट सेशनचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती घामाने भिजलेली दिसत आहे. दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने स्वत:चा एक सेल्फी पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिच्या डोळ्यातून अश्रू वाहताना दिसत आहेत. (Actress Ileana Dcruz Gets Emotional Post Workout Shares Post On Her Instagram Account)
इलियानाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आज एक असा क्षण होता, जो वर्कआउट केल्यानंतर मला कधीच जाणवला नाही. मी भावुक झाले आणि थोडी रडले.”
अभिनेत्रीने सांगितले कारण
आणखी एक पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीने त्यामागचे कारणही शेअर केले आहे. तिने लिहिले की, “कारण? स्ट्रेचिंग आणि कूल-डाऊन सत्राच्या शेवटी, जेव्हा ट्रेनर म्हणतो की, आता तुमचे हात तुमच्या बाजूला घ्या आणि स्वतःला मिठी मारा आणि तुमच्या शरीराचे आभार माना की ते तुमच्यासाठी काम करत आहे. त्याचे शब्द माझ्या हृदयाला भिडले आणि त्याचा खोलवर परिणाम झाला. हे करून पाहा आणि तुम्हाला कसे वाटते ते पाहा.”
इलियानाने बॉडी शेमिंगचाही केलाय सामना
काही काळापूर्वी इलियानाने सांगितले होते की, ती लहानपणापासून बॉडी शेमिंगची शिकार होत आहे. याबाबत एका मुलाखतीदरम्यान इलियानाने म्हटले की, “मला आजही तो दिवस आठवतो, जसा की काल घडलेलीच गोष्ट आहे. हे विचित्र आहे. कारण, अशा गोष्टी तुम्हाला हादरवून टाकतात. मी १२ वर्षांची असल्यापासून बॉडी शेमिंगचा बळी ठरत आहे. हे सर्व भयानक स्वप्नासारखे आहे.”
‘द बिग बुल’ मध्येही झळकली होती इलियाना
इलियानाच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘द बिग बुल’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटात तिच्यासोबत अभिषेक बच्चनही मुख्य़ भूमिकेत होता. तिने एका पत्रकाराची भूमिका साकारली होती. आता इलियाना रणदीप हुड्डासोबत ‘अनफेअर एँड लव्हली’ या चित्रपटात झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक
-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे
-श्रद्धा आर्याने केले रिसेप्शनचे फोटो शेअर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मेड फॉर इच अदर’