श्रद्धा आर्याने केले रिसेप्शनचे फोटो शेअर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मेड फॉर इच अदर’


‘कुंडली भाग्य’, फेम प्रिता म्हणजेच अभिनेत्री श्रद्धा आर्या नुकतेच तिच्या आयुष्यात लग्नबंधनात अडकली आहे. तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिने नौदल सेनेचा अधिकारी राहुल शर्मासोबत सात फेरे घेतले आहे. अशातच लग्नानंतर त्यांचे रिसेप्शन झाले आहे. दरम्यान त्यांच्या या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत.

श्रद्धाने या रिसेप्शनमध्ये काही खास पाहुण्यांना आमंत्रण दिले होते. यातील काही सुंदर आणि निवडक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये श्रद्धा आणि राहुल दोघेही खूप सुंदर दिसत आहे. ते दोघेही खूप खुश दिसत आहेत. (Kundali bhagya fame Shraddha arya share her reception photos on social media)

रिसेप्शनमध्ये नववधू श्रद्धाने पावडर ब्लू कलरची नेटची साडी नेसली आहे. तसेच तिने मिनिमल मेकअप केला आहे. अभिनेत्रीने डायमंड नेकलेस घातला आहे आणि भांगात सिंदुर भरलेला दिसत आहे. तसेच हातात चुडा भरलेला आहे. तो या फोटोमध्ये सिंपल पण तेवढीच क्यूट दिसत आहे.

राहुलने काळ्या रंगाचा सूट परिधान केला आहे. ज्यामध्ये तो खूपच हँडसम दिसत आहे. हे फोटो शेअर करून आर्याने कॅप्शन दिले आहे की, “कमांडर एंड मिसेस नागल.” तिच्या या फोटोवर तिचे चाहते खूप प्रतिक्रिया देत आहेत.

तसेच त्यांच्या रिसेप्शन पार्टीमध्ये त्या दोघांनी टू लेयर केक कापला आहे. त्यांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर सगळे त्यांच्या जोडीचे कौतुक करत आहे. श्रद्धाने तिच्या लग्नाबाबत खूप गोपनीयता राखली होती. तिने तिच्या पतीच्या नावाबद्दल कोणालाच सांगितले नव्हते. तसेच तिच्या पतीचा फोटो देखील दाखवला नव्हता. अचानक लग्नाबाबत सांगून तिने तिच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता


Latest Post

error: Content is protected !!