असं म्हणतात की, एक वेळेस तुमचं शिक्षण तुम्हाला उपाशी मारेल, परंतु तुमची कला तुम्हाला नक्कीच तारेल. कलेच्या बाबतीत आपल्या देशाला एक वरदानच मिळाले आहे. भारतात अनेक कलावंत आहे, ज्यांनी त्यांच्या कलेच्या जोरावर लाखो लोकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले आहे. लता मंगेशकर, मोहम्मद रफीपासून ते अरिजित सिंग आणि जुबिन नौटियाल यांसारखे अनेक गायक आहे. त्यांच्या आवाजाची जादू सगळ्यांवर आहे. असे अनेक गायक आहेत, ज्यांचे चाहते त्यांच्यावर पैसे देऊन त्यांचे कौतुक करतात. परंतु आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये फोक गायिका उर्वशी रदादिया हिच्यावर तिच्या चाहत्यांनी बादली भरून पैशांचा पाऊस पाडला आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, मंचावर बसून उर्वशी एक भजन गात असते. तिचे हे भजन ऐकून तिचा एक चाहता मंत्रमुग्ध होतो आणि त्याने बादली भरून पैसे आणून तिच्यावर त्या नोटांचा वर्षाव करतो. (Folk singer Urvashi radadiya voice fans showered note with buckets)
हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करून त्याने लिहिले आहे की, “हो खरे पैसे, फोक गायिका उर्वशी रदादियाची प्रचंड फॅन फॉलोविंग आहेत आणि तिच्या प्रत्येक लाईव्ह शोला अशाप्रकारे प्रतिसाद मिळत असतो. ही तिच्यासाठी सामान्य गोष्ट आहे. या पैशाचा उपयोग ती गरीब मुलींच्या लग्नासाठी आणि इतर कामांसाठी करते.” .
तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या आधी गायिकेने स्वतः एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले होते की, “समस्त हिरावडी ग्रूपद्वारे तुळशी विवाहाचे आयोजन केले आहे. तुमच्या सगळ्यांच्या बहुमूल्य प्रेमासाठी खूप खूप धन्यवाद.”
तिच्या या व्हिडिओवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत आणि तिचे कौतुक करत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-काय सांगता! रानू मंडल ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यासोबत करणार काम, एकेकाळी स्टेशनवर मागायची भीक
-रंगीबेरंगी कपडे घालून कारमधून उतरली आलिया, अभिनेत्रीचा नखरा पाहून नेटकऱ्यांनी ऐकवले तिला खरे-खोटे
-श्रद्धा आर्याने केले रिसेप्शनचे फोटो शेअर; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘मेड फॉर इच अदर’










