Wednesday, August 13, 2025
Home बॉलीवूड ठरलं तर! ‘या’ दिवशी रिलीझ होतोय आमिर अन् करीनाचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंग चड्ढा’

ठरलं तर! ‘या’ दिवशी रिलीझ होतोय आमिर अन् करीनाचा बहुप्रतिक्षित ‘लाल सिंग चड्ढा’

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि अभिनेत्री करीना कपूर खान यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘लाल सिंग चड्ढा’ची नवीन रिलीझ डेट समोर आली आहे. करीना आणि आमिरचे चाहते अनेक दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत होते. अशा परिस्थितीत चित्रपटाची रिलीझ डेट पाहून, चाहत्यांचा आनंद गगनात मावत नाहीये.

‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट आता १४ एप्रिल, २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट ११ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता, मात्र त्याची रिलीझ डेट पुढे ढकलण्यात आली आणि आता अखेर चित्रपटाची रिलीझ डेट पुन्हा जाहीर करण्यात आली आहे. (aamir khan and kareena kapoor s laal singh chaddha release date)

आमिर खान आणि करीना कपूर खान अभिनित ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट १४ एप्रिल २०२२ रोजी, म्हणजेच बैसाखीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आमिर खान प्रॉडक्शनने शनिवारी ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे.

आमिर खान प्रॉडक्शनने ट्विटरवर लिहिले की, “आमचे नवीन पोस्टर आणि चित्रपटाची नवीन रिलीझ डेट शेअर करताना आम्हाला आनंद होत आहे.” हे लिहिताना प्रॉडक्शन हाऊसने लाल सिंग चड्ढा या चित्रपटाचे नवीन पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केले आहे.

चित्रपटाच्या नवीन पोस्टरमध्ये आमिर खान आणि करीना कपूर खान यांच्यातील केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. पोस्टरमध्ये करीना कपूर आमिर खानच्या खांद्यावर डोके ठेवून बसलेली दिसत आहे.

याआधी आमिर खान आणि करीना कपूर खान यांची जोडी ‘३ इडियट्स’ या चित्रपटात एकत्र दिसली होती. या चित्रपटातील दोघांच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली होती. आता ही रोमँटिक जोडी ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटातून पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये आमिर खान पगडी आणि लांब दाढी असलेला शीख दिसत आहे, तर करीना सूटमध्ये दिसत आहे. संपूर्ण भारतात १०० हून अधिक ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कार्तिक आर्यनने ‘दोस्ताना २’बद्दल सोडले मौन, चित्रपटातून बाहेर काढण्याबद्दल केले मोठे वक्तव्य

-लवकरच शोमध्ये परतणार शमिता; एकटी नव्हे, तर ‘बिग बॉस १३’चे ‘हे’ दोन स्पर्धकही करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

-चहुबाजूंनी विरोध होत असताना, कोमेडियन वीर दासच्या समर्थनार्थ आली काम्या पंजाबी; म्हणाली…

हे देखील वाचा