चहुबाजूंनी विरोध होत असताना, कॉमेडियन वीर दासच्या समर्थनार्थ आली काम्या पंजाबी; म्हणाली…


कोमेडियन वीर दास या दिवसांत त्याच्या कॉमेडीमुळे नाही, एका वादग्रस्त विधानामुळे भलताच चर्चेत आला आहे. सर्व बाजूने त्याला टीकेचा सामना करावा लागत आहे. मात्र सर्वजण त्याला विरोध करत असतांना अभिनेत्री काम्या पंजाबी त्याच्या समर्थनार्थ पुढे आली आहे.

अलीकडेच वीर दासने अमेरिकेत भारतविरोधी वक्तव्य केल्यानंतर तो वादात सापडला. त्याच्या या वक्तव्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी त्याच्याविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आता अभिनेत्री काम्या पंजाबीने वीर दासच्या समर्थनार्थ आपले मत मांडले आहे. (kamya punjabi came in support of vir das said i agree with him)

काम्याने वीर दासच्या विधानाचे समर्थन केले आणि म्हणाली, “मी सहमत आहे की, भारताच्या दोन बाजू आहेत. त्यातला एक पैलू असा आहे की आपल्याला त्याचा एवढा अभिमान आहे की आपण त्यासाठी मरायलाही तयार आहोत. त्याच वेळी, एक पैलू असा आहे ज्यासाठी आपण आशा करतो आणि कठोर परिश्रम करतो की त्यात काही बदल व्हावेत, मग त्यात चुकीचे काय आहे?”

वीर दासचे समर्थन करत, अनेकांनी काम्याच्या या व्हिडिओला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी काही लोकांनी त्याचे वक्तव्य चुकीचे असल्याचेही म्हटले आहे. काम्याच्या व्हिडिओवर एका युजरने लिहिले की, “वीर दासने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची नकारात्मक बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला. जर कोणी भारताचे प्रतिनिधित्व करत असेल तर त्याने देशाची ८० टक्के चांगुलपणा दाखवावा, २० टक्के नकारात्मक बाजू नाही.”

काही दिवसांपूर्वी जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये झालेल्या एका शोमध्ये, वीर दासने देशाच्या दोन बाजूंबद्दल सांगितले होते. तो म्हणाला होता, “की मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर अत्याचार करतो.”

काम्या पंजाबीबद्दल सांगायचे झाले, तर तिने अभिनयानंतर अलीकडेच राजकारणात प्रवेश केला आहे. गेल्या महिन्यातच तिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. तिला राजकारणात येण्याची नेहमीच इच्छा होती. पण तिच्या व्यस्त शेड्युलमुळे आणि मालिका ‘शक्ती’च्या शूटिंगमुळे ती आधी हे करू शकली नाही. मात्र, आता तिचा शो बंद झाला असून काम्यासाठी राजकारणात येण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता


Latest Post

error: Content is protected !!