रवी दुबे हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा लोकप्रिय अभिनेता आहे. अनेक मालिकांमध्ये काम करून त्याने आपला भलामोठा चाहतावर्ग कमावला आहे. अभिनेता सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. नुकताच रवी दुबेचा असा एक फोटो समोर आला आहे की, जो फोटो पाहून त्याचे चाहते चिंतेत पडले आहेत. अशा अवस्थेत तो यापूर्वी कधीही दिसला नव्हता. अभिनेत्याने स्वतः सोशल मीडियावर एक असा फोटो पोस्ट केला आहे, जो अंगावर शहारे आणणारा आहे.
व्हायरल झाला रवी दुबेचा ‘तो’ फोटो
सोशल मीडियावर सक्रिय असलेला अभिनेता सतत त्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. याला त्याचे चाहतेही मोठ्या प्रमाणात प्रेम देत असतात. दरम्यान, रवी दुबेने स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, जो पाहून त्याचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. रवीची लेटेस्ट इंस्टाग्राम पोस्ट वेगाने व्हायरल होत आहे. त्याची अवस्था पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (ravi dubey shared his horrifying picture of him fans are concerned)
रवीचा जळलेला चेहरा
खरंतर रवी दुबेने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये रवी दुबेचा चेहरा अतिशय भयावह दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर बऱ्याच जखमा दिसत आहेत, तसाच त्याचा चेहराही भाजलेला दिसत आहे. हा फोटो पाहिल्यानंतर चाहते वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
का झालाय असा चेहरा?
रवी दुबेला कोणतीही दुखापत झालेली नाही आणि तो पूर्णपणे ठीक आहे. यासोबतच मेकअप करून त्याचा चेहरा असा बनवण्यात आला आहे. त्याचवेळी, रवी दुबेने हा लूक एमएक्स प्लेअरवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मत्स्य कांड’ वेब सीरिजसाठी केला होता. रवी या वेब सीरिजसाठी खूप प्रशंसा मिळवत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘बिग बॉस’ फेम अर्शी खानचा दिल्लीमध्ये झाला अपघात, रुग्णालयात करावे लागले भर्ती
-सैफने करीनासोबत लग्न करण्याआधी पहिली पत्नी अमृताला लिहिली होती एक चिठ्ठी, केला मोठा खुलासा
-‘कुसू कुसू’ गाण्याच्या शूटिंग दरम्यान नोरा फेतहीच्या पायात घुसली होती काच, मग पुढे तिने…