Thursday, March 5, 2026
Home बॉलीवूड हसताय ना! कपिलने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर अभिषेकने घेतले रणवीरचे नाव, कॉमेडियनही झाला लोटपोट

हसताय ना! कपिलने विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर अभिषेकने घेतले रणवीरचे नाव, कॉमेडियनही झाला लोटपोट

हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक अभिनेते आहेत, जे आपल्या मजेशीर अंदाजासाठी ओळखले जातात. ते पडद्यावर जरी गंभीर भूमिका साकारत असले, तरीही पडद्याबाहेर ते वेगळ्याच अंदाजात दिसतात. यामध्ये समावेश होतो, तो म्हणजे अभिनेता अभिषेक बच्चन याचा. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, सुपरस्टार रणवीर सिंग त्याच्या फॅशन सेन्ससाठी ओळखला जातो. मात्र, अनेकदा त्याच्यावर विनोद केले जातात. असाच काहीसा विनोद आता अभिषेकने केला आहे.

अभिषेकने रणवीरच्या कपड्यांची निवड पाहता, त्याला लग्नातील कपडे बनवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले पाहिजे, असे म्हटले आहे. अभिषेक आणि अभिनेत्री चित्रांगदा सिंग ‘द कपिल शर्मा शो’मध्ये झळकले आहेत. ते दोघेही आपल्या ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत ९३ हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Actor Abhishek Bachchan Jokingly Suggested To Kapil Sharma That Ranveer Singh Should Be Given A Contract For Designing Wedding Clothes)

कपिल शर्माने अभिषेक बच्चनसोबत ‘एक मैं और एक तू है’ या गाण्यावर परफॉर्मन्सही केला आहे. यावेळी चित्रांगदा आणि अर्चना पूरण सिंग याही डान्स करताना दिसत आहेत. कपिलने अभिषेकला विचारले की, “तुम्हाला आपल्या इंडस्ट्रीत मॅचमेकिंग कराराचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे असेल?” यावर अभिषेक बच्चन म्हणतो, “एकच तर आहे करण जोहर.” यानंतर सगळे हसायला लागतात. त्यानंतर कपिल अभिषेक बच्चनला विचारतो, “लग्नाच्या कपड्यांचे कॉन्ट्रॅक्ट?” अभिषेक हसतो आणि म्हणतो, “रणवीर सिंग, तो वधू आणि वर दोघांनाही घालू शकतो.” यानंतर सगळे हसायला लागतात.

खरं तर, रणवीर सिंग त्याच्या मजेशीर ड्रेससाठीही लोकप्रिय आहे.अभिषेक बच्चनच्या ‘बॉब बिस्वास’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन महत्त्वाच्या भूमिकेत आहे, तर चित्रांगदा त्याच्या पत्नीच्या भूमिकेत आहे. ‘बॉब बिस्वास’ हा ‘कहानी’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट किलर बॉब बिस्वास याच्याभोवती फिरतो. चित्रपटाच्या कथेत विद्या बालनने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

गौरी खान आणि सुजॉय घोष निर्मित, ‘बॉब बिस्वास’ हा चित्रपट ३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. अभिषेक बच्चन हा चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याने अनेक चित्रपटात काम केले आहे. त्याचे चित्रपट खूप पसंत केले गेले आहेत. सोशल मीडियावरही तो खूप सक्रिय असतो. तो अनेकदा त्याच्या चाहत्यांशी संवाद साधतो.

अभिषेक शेवटचा ‘द बिग बुल’ या चित्रपटात झळकला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अतरंगी कथा असणाऱ्या आणि प्रेमाचा त्रिकोण दाखवणाऱ्या ‘अतरंगी रे’ सिनेमाचा धमाल ट्रेलर रिलीझ

-हाय गर्मी! मोनालिसाने मिनी स्कर्ट घालून केला जबरदस्त डान्स, ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा

-बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, क्यूटनेस पाहून चाहतेही दंग

हे देखील वाचा