Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

शब्दाला जागला! ‘बिग बॉस १५’च्या स्पर्धकाने केले वचन पूर्ण, मायशा अय्यरची करून दिली कुटुंबाशी ओळख

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त रियॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’ पाहिले जाते. ‘बिग बॉसच्या १५’व्या पर्वातील अभिनेत्री तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यामध्ये चांगली मैत्री झाल्याचे पाहायला मिळते. ते सतत बिग बॉसच्या घरात मजामस्ती करताना दिसतात. तसेच बिग बॉसच्या प्रत्येक पर्वाप्रमाणे ‘बिग बॉस १५’ मध्येही काही जोडी होत्या. बिग बॉस या शोचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रेक्षक या शोची आतुरतेने वाट पाहात असतात. शोमध्ये भांडणे, वादविवाद, मैत्री आणि खुन्नस सर्व काही एकत्र पाहायला मिळतं. सर्व मसाला एकत्र पाहायला मिळत असल्याने चाहतेही शोकडे आकर्षित होतात.

तसेच दरवर्षी शोमध्ये अनेक लव्हस्टोरी पाहायला मिळतात. यावर्षीसुद्धा आपल्याला मायशा अय्यर आणि ईशान सेहगलची लव्हस्टोरी दिसून आली. मात्र, यांच्यात अजून एक नातं असं आहे जे प्रेक्षकांना फार आवडत आहे आणि या दोघांमध्ये मैत्रीच्या पुढं काही घडणार का याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. ईशान आणि मायशाचेही खूप लवकरच चांगले बाँडिंग झाले होते. त्यामुळे अनेक स्पर्धक आणि अनेक प्रेक्षकांना असे वाटले की, त्यांच्यातील प्रेम केवळ शोसाठी आहे.

जेव्हा ईशानचा मित्र राजीव अडातिया यालाही शोमध्ये वाईल्डकार्ड एन्ट्री मिळाली, तेव्हा त्याने सांगितले की, त्याच्या कुटुंबातील सदस्यांना ईशान आणि मायशाचे नाते आवडत नाही. दोन्ही लव्ह बर्ड्स हे पाहून थोडे नाराज झाले, पण ईशानने त्याच्या लेडी लव्हला वचन दिले की, तो बाहेर जाऊन तिची त्याच्या आई आणि बहिणीशी ओळख करून देईल आणि त्यांना मायशा नक्कीच आवडेल.

ईशानने आपले वचन पूर्ण केले आहे. कारण, त्याने अलीकडेच त्याची बहीण ट्यूलिप आणि आईशी मायशाची ओळख करून दिली आहे. या भेटीतील एक गोंडस फोटोही त्यांनी शेअर केला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच ईशान आणि मायशा यांनी त्यांचे नाते सिद्ध केले होते आणि आता त्याने आई आणि बहिणीची ओळख करून देत सर्वांची मने जिंकली आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-पारदर्शी ब्रालेट आणि लांब कोट घातलेल्या नेहा कक्करचा पॅरिसच्या रस्त्यांवर दिसला कातिलाना अंदाज

-‘तुझे अक्सा बीच घूमा दूं’ गाण्यावर अनुपमा आणि अनुजने रस्त्यावर केला धमाकेदार डान्स

-‘अंतिम’च्या स्क्रिनिंगमध्ये रंगली दिशा पटानीच्याच लूकची चर्चा, युजर्स म्हणाले, ‘सर्जरी केली का?’

हे देखील वाचा