Tuesday, June 25, 2024

‘अंतिम’च्या स्क्रिनिंगमध्ये रंगली दिशा पटानीच्याच लूकची चर्चा, युजर्स म्हणाले, ‘सर्जरी केली का?’

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी बऱ्याच दिवसांनी एका कार्यक्रमाचा भाग होताना दिसली. एवढ्या वेळानंतरही ही अभिनेत्री तिच्या फॅशनेबल लूकने प्रभावित करण्यात कमी पडली नाही. अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्मा (Aayush Sharma) यांचा ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट शुक्रवारी (२६ नोव्हेंबर) प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी अनेक बॉलिवूड कलाकारांनी या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. सलमानची ‘राधे’ची सहकलाकार दिशा पटानीही (Disha Patani) पोहोचली होती. या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहते तिच्या लूकवर कमेंट करत आहेत. दिशाने सर्जरी केल्याचे काहींना वाटते. त्याचवेळी तिचा चेहराही नोरासारखाच दिसत असल्याचे बोलले जात आहे.

दिशाला पाहून चाहत्यांना बसला धक्का
दिशा शेवटच्या प्रीमियरला पिवळा टॉप आणि निळ्या रंगाच्या जीन्स परिधान करून आली होती. तिने फोग्राफर्सना पोझही दिली. मात्र, व्हायरल भयानीवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओवर युजर्सनी दिशाच्या लूकवर अनेक कमेंट्स केल्या आहेत.

कोणाला नाक बदलले वाटले, तर कोणाला भुवया
एका युजरने लिहिले आहे की, “ती खूप वेगळी दिसत आहे.” यावर असे उत्तर आहे की, दिशाने भुवयांचा आकार बदलला आहे. दुसर्‍या युजरने लिहिले की, “ती विचित्र दिसत आहे, कदाचित फिलर्समुळे.” त्याचवेळी आणखी एका युजरने तिचे नाक वेगळे दिसत आहे, असे लिहले आहे. अनेक युजर्स दिशा अभिनेत्री नोरा फतेहीसारखी दिसत आहे, असे म्हणत आहेत. त्याचवेळी, काही युजर्सना असे वाटते की, भुवया पातळ झाल्यामुळे तिचा चेहरा बदलत आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत १४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये दिसणार
दिशा पटानी सलमान खानसोबत ‘भारत’ आणि ‘राधे’ या चित्रपटात दिसली आहे. तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘एक व्हिलन रिटर्न्स’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया देखील दिसणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करणारी उर्फी दिसली साडीत, पाहून नेटकरीही म्हणाले, ‘आज तू साधी साडी…’

-रणवीर सिंगच्या बहुप्रतिक्षित ‘८३’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित, ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

-अनुष्का शर्माचा फोटो पाहून चाहते करू लागले विराट कोहलीचं कौतुक, काय असेल कारण?

हे देखील वाचा