सुनील शेट्टीचा (Suniel Shetty) मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी (Ahaan Shetty) सध्या त्याच्या ‘तडप’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. त्याचा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. दरम्यान अभिनेता अलीकडेच त्याची गर्लफ्रेंड तान्या श्रॉफसोबत (Tania Shroff) लंच डेटवर दिसला होता. दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. अलीकडेच अहानची गर्लफ्रेंड तान्याने तिचे आणि अहानचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तान्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘तडप’च्या (Tadap) शूटिंगदरम्यानचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती अहानच्या मांडीवर बसलेली दिसत आहे. दोघांमध्ये रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. (ahan shetty girlfriend tanya shared romantic photos with him)
हे फोटो शेअर करत तान्याने लिहिले आहे की, “तू किती कष्ट आणि मेहनत घेतली आहे, हे कोणालाच माहिती नाही. पण मी भाग्यवान आहे की, मी तुला पाहिले आहे. तू सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत आणि स्वतःशी खरा राहिलास. तू तुझ्या कामात दाखवलेली तळमळ मला प्रेरणा देते. तू ज्या पद्धतीने तुझ्या लोकांवर प्रेम करतो आणि त्यांचे संरक्षण करतो, ते खूपच प्रभावी आहे. मी शेवटपर्यंत तुझ्यावर प्रेम करीन आणि प्रत्येक अडचणीत तुझ्या पाठीशी उभा राहीन. कधीच बदलू नको.”
तान्याच्या पोस्टवर कमेंट करताना अहानने लिहिले, ‘आय लव्ह यू.” तसेच यावर त्याचे वडील सुनील शेट्टी, अथिया शेट्टी आणि तिचा बॉयफ्रेंड केएल राहुल यांनी हार्ट इमोजी शेअर केला आहे. चाहत्यांनीही या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
१० वर्षांपासून आहेत रिलेशनशिपमध्ये
अहान आणि तान्या जवळपास १० वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते अनेकदा एकमेकांसाठी रोमँटिक पोस्ट करत असतात.
‘तडप’च्या रिलीझवर सुनील शेट्टीने मुलगा अहानला शुभेच्छा आणि सल्ला देत लिहिले की, “जर तू खरा आहेस तर लोकही खरे आहेत. लोक तुझ्या टीका करत असतील तर ते मनावर घेऊ नको, तर धडा म्हणून घे. स्तुतीच्या नशेत असताना कधीही बाता मारू नको. ही एक उपलब्धी आहे. नेहमी जमिनीवर रहा. प्रामाणिक आणि सत्यवादी राहा. तुझे फॉलोव्हर्स महत्वाचे आहे, जे तुझे मित्र बनतील. लोक तुझ्यावर प्रेम करतात, मी तुझ्यावर प्रेम करतो बेटा.” अभिनेत्याची ही पोस्टही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती.
हेही वाचा-