Sunday, June 23, 2024

लय भारी! योद्धाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार सुनील शेट्टी, आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक केला रिलीझ

जबरदस्त ऍक्शन अभिनेता म्हणून ओळखला जाणारा सुनील शेट्टी (Suniel Shetty) दीर्घ काळानंतर पुन्हा एकदा धमाकेदार पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे. यावेळी सुनील आपल्याला हटके भूमिकेत दिसणार आहे. यावेळी तो रोमँटिक हिरोच्या भूमिकेत नाही, तर एका योद्धाच्या भूमिकेत झळकणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्या ‘मरक्कर: द लायन ऑफ अरेबियन सी’ चित्रपटात सुनील आपल्या अभिनयाचा डंका वाजवणार आहे. अशातच आता आगामी चित्रपटातील सुनीलची पहिली झलकही समोर आली आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘मरक्कर: द लायन ऑफ अरेबियन सी’ या चित्रपटात सुनील सोळाव्या शतकातील समुद्री योद्धाची भूमिका साकारताना दिसणार आहे. याची माहिती त्याने स्वत: त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. यामध्ये त्याने चित्रपटाच्या फर्स्ट लूकचा व्हिडिओ शेअर केला आहे. (Actor Suniel Shetty Returns With A Bang In Films After 5 Years His Warrior Look Viral)

सुनील शेट्टीने इंस्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये सुनील एका फायटरप्रमाणे दिसत आहे. त्याची वाढलेली दाढी, अंगावर लोखंडी चिलखत आणि हातात तलवार पाहून सुनील शेट्टी एका ऐतिहासिक व्यक्तिरेखेत दिसणार असल्याचे समजते. त्याच्या या पोस्टला आतापर्यंत ५६ हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

खरं तर, २ डिसेंबरला सुनील शेट्टीचा ‘मरक्कर: द लायन ऑफ अरेबियन सी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट नौदल प्रमुख मोहम्मद अली उर्फ ​​कुंजली मरक यांच्या जीवनावर आधारित आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, सुनील शेट्टीचा हा लूक हॉलिवूड चित्रपट ‘ट्रॉय’पासून प्रेरित आहे. या चित्रपटाची पहिली झलक पाहून समजू शकते की, या चित्रपटात सुनील शेट्टीचे बरेच फाईट सीन्स पाहायला मिळणार आहेत.

आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या पुनरागमनामुळे चाहते खूप उत्सुक आणि आनंदी आहेत. सुनील शेट्टीला सोशल मीडियावर चाहत्यांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. हा व्हिडिओ शेअर करण्यासोबतच सुनील शेट्टीने “नमस्ते,” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. केवळ चाहतेच नाही, तर सेलिब्रिटीही सुनील शेट्टीच्या या जबरदस्त लूकचे कौतुक करताना दिसत आहेत.

अभिषेक बच्चनने कमेंट करत हार्ट इमोजी पोस्ट केला आहे, तर अभिनेत्री रुहानिका धवनने कमेंट बॉक्समध्ये लिहिले आहे की, “वाट पाहवत नाही.” त्याचबरोबर सुनील शेट्टीचे चाहते कमेंट बॉक्समध्ये भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका चाहत्याने “किंग इज बॅक,” असे लिहिले  आहे. तसेच, दुसऱ्या एकाने लिहिले की, “अण्णा, मी खूप आनंदी आहे, तुम्हाला पुन्हा पडद्यावर पाहण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.”

सुनील शेट्टी यापूर्वी ‘मुंबई सागा’ या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात जॉन अब्राहम, इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘डॅड स्टॉप इट यार!’, एनसीबीच्या ऑफिसबाहेर वडिलांचे वागणे पाहून वैतागला आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट

-एकदम कडक! ‘अंतिम’ चित्रपटाच्या प्रीमिअरला लावली ‘या’ अभिनेत्रीने हजेरी, सौंदर्यावर तुम्हीही व्हाल फिदा

-अभिनेत्री प्राची सिंगने केला नवीन व्हिडिओ शेअर, गाण्यातून व्यक्त केले कृष्णप्रेम

हे देखील वाचा