दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) हे बहुप्रतिक्षित आरआरआर (RRR) या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. जो खूपच शानदार आहे. हा चित्रपट एसएस राजामौली (SS Rajamouli) यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात आलिया भट्ट देखील आहे. अजय देवगण (Ajay Devgan) मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ७ जानेवारी, २०२२ ला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटातील ऍक्शन सीन खूप खतरनाक आहेत.
आरआरआर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
‘आरआरआर’ चित्रपटाचा ट्रेलरला पाहून असा अंदाज लावू शकतो की, हा चित्रपट खूप धमाकेदार आणि शानदार असणार आहे. चित्रपटात ऍक्शन आणि ड्रामा पाहायला मिळणार आहे. राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांचा डायलॉग देखील खूप झक्कास आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स आणि ऍक्शन सीन खूप मस्त आहेत. हा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ट्रेलरमध्ये आलिया भट्ट अगदी दाक्षिणात्य अभिनेत्रीसारखी दिसत आहे.
या चित्रपटात भन्नाट ऍक्शन सीन आहेत, परंतु आलिया भट्टचे (Alia Bhatt) चाहते खूप निराश आहेत. कारण, या ट्रेलरमध्ये तिचा फारसा काही रोल नाही. या चित्रपटाची वाट दाक्षिणात्य नाही, तर संपूर्ण देशातील प्रेक्षक पाहत आहेत.
ट्रेलरविषयी बोलायचं झालं, तर हा ट्रेलर काही तासांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. तसेच या ट्रेलरला आतापर्यंत १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर १ लाखांपेक्षाही अधिक लाईक्स आणि ४ हजारांहून अधिक कमेंट्सचाही पाऊस पडला आहे.
एसएम राजमौली यांचा ‘आरआरआर’ चित्रपट दोन भारतीय क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमारं भीम यांच्यावर आधारित आहे, जी एक काल्पनिक स्टोरी आहे. चित्रपटात दोन क्रांतिवीर ब्रिटिश आणि हैदराबादचे निजाम यांच्याविरुद्ध लढाई करताना दाखवले आहे. चित्रपटातील दोन गाणी प्रदर्शित झाली आहेत, ज्यांना प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा-