सनी देओल आणि करिश्मा कपूरच्या ‘छम्मक छल्लो’ गाण्याचे अरविंद कल्लू आणि शिल्पी राजने केले भोजपुरी व्हर्जन


गेल्या काही दिवसांपासून भोजपुरीमध्ये हिंदी गाणी रिक्रिएट केली जात आहेत. याआधी पवन सिंग (Pawan Singh) आणि खेसारी लाल यादव (Khesari Lal Yadav) यांनी अनेक गाण्यांचे भोजपुरी वर्जन गायले होते. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. आता जिथे खेसारी लाल अक्षरा सिंगसोबत बादशाहच्या ‘पानी पानी’ या गाण्याच्या भोजपुरी व्हर्जनमुळे चर्चेत आला आहे. दुसरीकडे आता अरविंद अकेला कल्लू आणि आकांशा दुबे यांचे ‘छम्मक छल्लो’ (Chamak Chhallo) हे गाणे प्रदर्शित झाले आहे, जे सनी देओल (Sunny Deol) आणि करिश्माच्या गाण्यावरून तयार करण्यात आले आहे.

भोजपुरी गाण्याचा ‘छम्मक छल्लो’ व्हिडिओ वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरीच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित करण्यात आला आहे. याला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. बुधवारी (८ डिसेंबर) हा व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला. अवघ्या काही तासांत छम्मक छल्लो’ व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे आत्तापर्यंत अडीच लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले असून, सुमारे २० हजार चाहत्यांनी ते लाईक केले आहे.

गाण्याच्या व्हिडिओमध्ये अरविंद अकेला कल्लूचा हिप हॉप स्टाईल पाहायला मिळत आहे, तर अभिनेत्री आकांक्षा दुबेचा बोल्ड लूक पाहायला मिळत असून, यामध्ये दोघांची जोडी अप्रतिम दिसत आहे. त्यांच्यात दिसणारी जबरदस्त केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली आहे. या गाण्याची आणखी एक खास गोष्ट म्हणजे यात रॅपही करण्यात आले
आहे.

सनी देओल आणि करिश्मा कपूर यांच्या ‘छम्मक चलो जरा धीरे चल्लो’ या गाण्यावर हे गाणे तयार करण्यात आले आहे. कुमार सानूने त्याच्या गाण्याला आपला उत्कृष्ट आवाज दिला होता तर, आनंद मिलिंद त्याचे संगीत दिग्दर्शक होते. आता जर अरविंद अकेलाच्या गाण्याबद्दल बोलायचे झाले, तर अरविंद अकेला कल्लूसोबत शिल्पी राजने आपल्या उत्तम आवाजाने ते गाणे सजवले आहे. याचे गीत अजय बच्चन यांनी लिहिले असून संगीत प्रियांशू सिंग यांनी दिले आहे. हा व्हिडिओ आकांक्षा दुबेवर चित्रित करण्यात आला आहे. या व्हिडिओचे दिग्दर्शन भोजपुरिया यांनी केले आहे. कोरिओग्राफर राहुल यादव आहेत. प्रॉडक्शन हेड पंकज सोनी आणि हायपोथिसिस अरबिंदा मिश्रा आहेत.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!