पंजाबी गाण्यावर हरियाणाच्या डान्सिंग क्वीन सपना चौधरीचा ग्लॅमरस स्वॅग


हरियाणवी डान्सर असणाऱ्या सपना चौधरीने (sapna chaudhary) सर्वांच्याच मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या डान्सचा खास जलवा पाहण्यासाठी प्रत्येक जणं आतुर असतो. सपना चौधरीच्या डान्सचे चाहते हे हरियाणातच नाही तर पूर्ण देशात आहेत. सपनाचे सोशल मीडियावरती देखील खूप मोठे फॅन फॉलोइंग असून, ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. नेहमीच ती तिच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो आणि डान्सचे व्हिडिओ शेअर करत असते. तिने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओंना तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सद्वारे भरभरून प्रेम देतात. सपनाने काही वेळेपूर्वीच इंस्टाग्रामवरती एक रिल व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये ती खूप ग्लॅमरस दिसत असून, तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे. तिने या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाचे जॅकेट आणि काळ्या रंगाची जीन्स घातली असून, त्यावर काळ्या रंगाचा गॉगल देखील लावला आहे. सपना चौधरी तिच्या या व्हिडिओमध्ये खूप छान आणि बोल्ड दिसत असून, तिचा हा वेस्टर्न ग्लॅमरस लूक सर्वांनाच आवडत असल्याचे दिसत आहे.

हा व्हिडिओ शूट करण्यासाठी सपना चौधरी एका गार्डनमध्ये उभी आहे. या व्हिडीओमध्ये ती उभ्याउभ्या डान्स करताना दिसत असून, तिच्या बॅकग्राऊंडला पंजाबी गाणे चालू आहे. शिवाय ती व्हिडिओमध्ये चश्मा खाली करून डोळा मारते हे पाहून सर्व चाहते घायाळ झाले आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत ३० हजाराहून अधिक लाईकस आले आहेत. तिने या व्हिडिओला ‘क्रेझी’ असे कॅप्शन दिले आहे. यासोबत तिने अनेक हॅशटॅगचा देखील वापर केला आहे.

सपना चौधरीने हरियाणा ते बॉलीवूडपर्यंतचा प्रवास करत चाहत्याच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सपना चौधरीचा सोशल मीडियावरती खूप मोठा चाहतावर्ग आहे. चाहते नेहमीच तिच्या व्हिडिओ आणि फोटोवर कमेंट्स कर त्याच्याबद्दल असलेले आपले प्रेम व्यक्त करतात.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!