Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

मीराने केले शाहिदविषयी मोठे खुलासे; ऐकून प्रत्येक मुलीला वाटेल, की असा नवरा…

कोणत्याही मुलीचा नवरा चांगला असेल, तर तिचे जीवन चांगले बनते. प्रेम करणारा आणि काळजी घेणारा नवरा भेटणे म्हणजे आशीर्वादापेक्षा कमी नाही. याबाबतीत शाहिद कपूर (shahid kapoor)पहिल्या स्थानावर आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मीरा राजपूतवर (mira rajput) असलेले त्याचे प्रेम आपल्याला अनेकदा पाहायला मिळते. मीरा आणि शाहिद कपूरचे लग्न २०१४ साली झाले होते. ते सहा वर्षापासून एकत्र संसार करत आहेत. त्यांना दोन गोड मुले देखील आहेत.

मीराने केला शाहिदविषयी खुलासा
स्वतः मीरा राजपूतने खुलासा केला आहे की, शाहिद तिच्या दोन्ही गरोदरपणात नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिला. त्याने तिला कोणत्याच अडचणींचा सामना करून दिला नाही आणि तिची काळजी देखील घेत होता. एका स्त्रीला याच्या व्यतिरिक्त काय हवे असते. शाहिद कपूर असे देखील म्हणतो की, ती एक आदर्श पत्नी आहे.

शाहिद कपूर नेहमीच करतो मीराचे कौतुक
सोशल मीडियावर किंवा अवॉर्ड फंक्शनमध्ये तो नेहमी मीराचा हात धरून उभा असतो. संधी मिळाली तर तो मीराचे कौतुक देखील करतो.

एका मुलीची सर्वात मोठी इच्छा अशी असते की, तिचा नवरा फक्त तिला समर्पित असावा. तर लग्नानंतर शाहिदबद्दल एकही प्रेम प्रकरण ऐकण्यात आले नाही. तो ‘एक पत्नी पुरुष’ आहे आणि संपूर्ण जगाला ही गोष्ट ठाऊक आहे की, शाहिद कपूर फक्त आणि फक्त त्याच्या पत्नीवरच प्रेम करतो. ती त्याला आयुष्यभर त्याच्या जीवनात हवी आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा