बाप रे! लाखो रूपयांचा घोडा आणि मांजरी देऊन, सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनला अडकवलंय त्याच्या जाळ्यात


बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (jacqeline fernandez) ही अनेक दिवसापासून चांगलीच चर्चेत आहे. ती सध्या २०० कोटींच्या मनी लॉन्डरिंग प्रकरणात अडकली आहे. ५ डिसेंबर रोजी देशाबाहेर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्रीला विमानतळावरच थांबवले होते. तिच्या विरोधात ईडीने लूकआउट नोटीस पाठवली आहे. अशातच ती पुन्हा एकदा गुरुवारी (९ डिसेंबर) रोजी पुन्हा एकदा ईडीसमोर आली आहे. तिहाड कारागृहात पैशाच्या फसवणुकी प्रकरणात अटक असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्यासोबत असलेल्या तिच्या रिलेशनबाबत तिची चौकशी करण्यात आली आहे. ईडीने तिसऱ्या वेळेस तिची चौकशी केली आहे.

ईडीच्या हाती आलेल्या माहितीनुसार, जॅकलिन आणि सुकेश चंद्रशेखर यांच्यात प्रेम संबंध होते आणि तो अभिनेत्रीवर पाण्यासारखा पैसा खर्च करत होता. त्याने तिला सोन्याची आणि डायमंडची ज्वेलरी गिफ्ट दिली होती. यासोबत ५२ लाखांचा घोडा आणि ९-९ लाखांच्या चार पार्शियन मांजरी देखील गिफ्ट दिल्या आहेत. त्याने तिच्यासाठी अनेक चार्टर्ड फ्लाईट्स देखील बुक केल्या होत्या. ईडीच्या माहितीनुसार सुकेश चंद्रशेखरने तिच्यावर १० कोटी रुपये खर्च केले आहेत. (jacqueline fernandez came on the radar of ed worth 50 lakhs and four cats 9 9 lakhs)

हाती आलेल्या माहितीनुसार, जॅकलिन मुंबईवरून दिल्लीला आली आणि त्यानंतर चेन्नईला येण्यासाठी सुकेशने चार्टर्ड फ्लाईट बुक केली होती. तिचा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्याचा सगळा खर्च देखील त्यानेच केला होता. ईडीला तीन वेळा त्यांच्या भेटीची माहिती मिळाली आहे. यासंबंधित तिची चौकशी केली जात आहे.

सुकेशने असे सांगितले होते की, तो जॅकलिनसोबत रिलेशनमध्ये आहे. त्यांचे अनके फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये जॅकलिन सुकेशच्या गालावर किस करताना दिसत होती. हा फोटो एका फाईव्ह स्टार हॉटेलमधील होता. परंतु जॅकलिनची चौकशी करताना तिने या रिलेशनला नकार दर्शवला आहे. चौकशी केल्यांनतर अशी माहिती समोर आली आहे की, सुकेश तिहाड जेलमध्ये असताना त्याचे अभिनेत्रीसोबत अनेकवेळा बोलणे झाले आहे. यानंतर ईडीने तिहाड जेलमध्ये जाऊन देखील चौकशी केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुकेशने केवळ जॅकलिनला नाही,तर अभिनेत्री नोरा फतेही हिला देखील त्याच्या जाळ्यात अडकवले आहे. त्याने नोराला देखील अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. त्यामुळे नोराची देखील चौकशी सुरु आहे. माध्यमातील वृत्तानुसार सुकेशने नोराला एक कोटीची बीएमडब्ल्यू आणि एक आयफोन गिफ्ट दिला होता. १४ ऑक्टोबर रोजी तिची देखील ईडीने चौकशी केली होती. नोराला सुकेश समोर बसवून अनेक प्रश्न विचारले होते. नोराने सांगितले होते की, २०२० साली ती एका कार्यक्रमाला गेली होती. चेन्नईमध्ये झालेल्या या कार्यक्रमात सुकेशची पत्नी आणि अभिनेत्री लीना पॉलने तिला बोलावले होते. लीना देखील एक अभिनेत्री आहे आणि तिने ‘मद्रास कॅफे’ या चित्रपट काम केले आहे.

सुकेश चंद्रशेखरबाबत या केसमध्ये सगळ्यात आधी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला होता. या एफआयआरवर ऑगस्टमध्ये चौकशी सुरु झाली. त्याच्यावर असा आरोप आहे की, शिविंदर सिंग आणि मालविंदर सिंग यांना कारागृहामधून बाहेर काढेल असे सांगून त्यांच्या पत्नींची २०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. तो स्वतःला कधी पीएम ऑफिस आणि गृह मंत्रालयाचा अधिकारी असल्याचे सांगतो. या प्रकरणी तो सध्या तिहाड कारागृहात बंद आहे. परंतु आता त्याच्याशी संबंध आल्याने जॅकलिन अडचणीत सापडली आहे.

हेही वाचा :

 


Latest Post

error: Content is protected !!