बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) यांची प्रेमकहाणी ‘ब्रह्मास्त्र’ (Brahmastra) चित्रपटाच्या सेटवर २०१७ मध्ये सुरू झाली होती. आता हा चित्रपट जवळपास पूर्ण झाला असून, त्याचे मोशन पोस्टरही रिलीझ झाले आहे.
‘ब्रह्मास्त्र’च्या मोशन पोस्टर रिलीझ लॉन्च इव्हेंट दरम्यान, दिग्दर्शक अयान मुखर्जीने स्वतः कबूल केले की, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर चित्रपटाच्या रिलीझपूर्वी कपल म्हणून एकत्र दिसावे, अशी त्याची इच्छा नव्हती. खरं तर, एका चाहत्याने अयान मुखर्जीला विचारले की, रणबीर आणि आलियाची प्रेमकहाणी शूटिंग सेटवर विचलित करत होती का?
या प्रश्नाचे उत्तर देताना अयान मुखर्जीने सांगितले की, “मी गेल्या ४ वर्षांपासून रणबीर आणि आलियाच्या मागे लागलो आहे की, त्यांनी कुठेही एकत्र दिसु नये.” इतकंच नाही, तर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी त्याच्यामुळे घडू शकल्या नसल्याचेही अयानने मान्य केले आहे. याबद्दल बोलताना अयान म्हणाला की, “खरं सांगायचं तर, जेव्हा आम्ही चित्रपट सुरू केला तेव्हा मला वाटले की, रणबीर आणि आलिया ही सर्वोत्तम कास्टिंग आहे. हे दोघे एकत्र खूप छान दिसत होते.” (This person become villian in ranbir kapoor and alia bhatt relation)
याविषयी पुढे बोलताना अयान मुखर्जी म्हणाला की, “त्यानंतर रणबीर आणि आलियाची मैत्री झाली. तसेच दोघे खूप चांगले मित्र बनले, त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली.” अयान म्हणाला की, “माझा चित्रपट (ब्रह्मास्त्र) प्रदर्शित झाल्यावरच लोकांनी त्यांना एकत्र पाहावे, अशी माझी इच्छा होती. त्यांच्या आयुष्यात अनेक गोष्टी माझ्यामुळे घडू शकल्या नाहीत. कारण जेव्हा ते बाहेर जायचे, तेव्हा मी त्यांच्या मागे जायचो आणि म्हणायचोे की, तुम्ही दोघे माझा चित्रपट खराब कराल. कृपया सोबत जाऊ नका.”
दुसरीकडे चित्रपटाच्या मोशन पोस्टरला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. अशातच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हेही वाचा-