अंकिता अन् विकीने ‘मिस्टर एँड मिसेस’ जैनचा मॅचिंग नाईट सूट घालून केलं ‘हे’ काम, व्हिडिओ व्हायरल


अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांचे लग्न १४ डिसेंबर रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटामाटात पार पडला. लग्नानंतर या नवविवाहित जोडप्याचे वेगवेगळ्या विधींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लोखंडेवरून मिसेस जैन बनलेली अभिनेत्री तिच्या वैवाहिक जीवनामुळे खूप आनंदी आहे. अंकिताने सोशल मीडियावर एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये नवीन कपलचे प्रेम दिसत आहे.

मिस्टर जैन आणि मिसेस जैन यांचा बूमरँग व्हिडिओ
अंकिताने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘मिस्टर जैन आणि मिसेस जैन’ या कॅप्शनसह एक बूमरँग व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अंकिता आणि तिचा पती विकी जैन एकसारख्या नाईट ड्रेसमध्ये दिसत आहेत. त्यांच्या नाईट ड्रेसच्या मागील बाजूस मिस्टर जैन आणि मिसेस जैन हा मोनोग्राम छापलेला आहे. व्हिडिओमध्ये विकी अंकिताच्या कपाळावर किस घेताना दिसत आहे आणि ती स्माईल देताना दिसत आहे. अभिनेत्रीने बनी ईयर हेअरबँड घातलेला दिसत आहे. दोघेही एकमेकांचा हात घट्ट पकडून ठेवताना दिसत आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर चाहते भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

चाहते आणि मित्र देत आहेत जोडप्याला लग्नाच्या शुभेच्छा
अंकिताच्या या बूमरॅंग व्हिडिओवर चाहते आणि मित्र तिचे अभिनंदन करत प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दोघांच्या वैवाहिक आयुष्याला शुभेच्छा देण्यासोबतच ते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही करत आहेत. अंकिताने तिच्या लग्नात खूप धमाल केली होती. ज्याचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

अंकिता लोखंडे-विकी जैन यांचे शानदार लग्न
मुंबईतील ग्रँड हयात येथे अंकिता (Ankita Lokhande) आणि विकी (Vicky Jain) यांचे लग्न झाले होते. लग्नापूर्वी हळदी, मेहंदी, संगीत असे सर्व विधी केले गेले. दोघांनीही त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि मित्रांसाठी रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनमध्ये टीव्ही आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते. एकता कपूर, मृणाल ठाकूर, दिशा परमार, एजाज खान, पवित्रा पुनिया, माही विजय या कलाकारांनी लग्नाला हजेरी लावली, तर कंगना रणौत तिच्या संगीत सोहळ्यात पोहोचली होती.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!