अर्रर्र! ‘जलपरी’ बनलेल्या नोराला स्ट्रेचरवर पाहून चाहते चिंतेत, ‘दिलबर गर्ल’ला झालंय तरी काय?


बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेहीने नृत्याच्या जोरावर स्वतःची आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. तिने ‘दिलबर’ आणि ‘हाय गर्मी’ यांसारख्या गाण्यांनी खास ओळख बनवलीये. नोरा नेहमीच तिच्या कोणत्या ना कोणत्या लूकमुळे चर्चेत येत असते. नुकताच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात ती जलपरीच्या लूकमध्ये दिसत आहे. तिला स्ट्रेचरवरू नेले जात आहे. नोराचा हा व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्यामुळे आता नोराला नेमकं काय झालंय, असे अनेक प्रश्न विचारत चाहते चिंता व्यक्त करत आहेत. चला तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण आहे तरी काय…

नोरा स्ट्रेचरवर पडलेली दिसली
खरं तर नोराचा (Nora Fatehi) हा व्हिडिओ गुरु रंधावासोबत (Guru Randhawa) एक म्युझिक व्हिडिओ शूटिंग करतानाचा आहे. तसेच तिला काहीच झालेलं नाहीये. ती जलपरीच्या पोशाखात दिसत आहे, ज्यामुळे तिचे पाय बांधलेले आहेत. अशा परिस्थितीत त्यांना चालणे शक्य नसल्याने क्रू मेंबर तिना स्ट्रेचरवरून खाली पाण्यात टाकत आहेत. हा व्हिडिओ प्रसिद्ध बॉलिवूड गायक गुरु रंधावाने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हे इतके सोपे नाही. घरी करून बघू नका.”

त्याच्या या व्हिडिओला आतापर्यंत ३१ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, ५ लाखांपेक्षाही अधिक लाईक्सचा पाऊस या व्हिडिओवर पडला आहे. त्याचबरोबर ३ हजारांपेक्षाही अधिक कमेंट्स चाहत्यांनी केले आहेत.

याआधीही पोस्ट केली होती शेअर
याआधीही गुरु रंधावाने म्युझिक पोस्टर शेअर केला होता. त्यात नोरा पाण्यात झोपलेली दिसली, तर गुरु तिच्या बाजूला बसला आहे. त्याचा हा व्हिडिओ प्रदर्शनापूर्वीच जोरदार चर्चेत आहे. नोराच्या या लूकला चांगली पसंती मिळत आहे. ती नेहमीप्रमाणेच ग्लॅमरस दिसतेय.

नोराने चित्रपटातही काम केले आहे. त्यामध्ये ‘भारत’ आणि ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ या चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा –


Latest Post

error: Content is protected !!