Monday, October 27, 2025
Home बॉलीवूड Good Bye 2021: कुठे ८, तर कुठे १० वर्षांनी झाले चिमुकल्या पावलांचे आगमन, २०२१मध्ये पालक झालेले टीव्ही कलाकार

Good Bye 2021: कुठे ८, तर कुठे १० वर्षांनी झाले चिमुकल्या पावलांचे आगमन, २०२१मध्ये पालक झालेले टीव्ही कलाकार

साल २०२१ मध्ये, अनेक टेलिव्हिजन सेलिब्रिटी पहिल्यांदाच पालक बनून प्रसिद्धीच्या झोतात आले. या सेलिब्रिटींमध्ये नकुल मेहता, शाहीर शेख, अनिता हसनंदानी, मोहित मलिक, किश्वर मर्चंट, राजीव सेन यांसारख्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. या लेखात जाणून घेऊयात अशा कलाकारांबद्दल, ज्यांच्या घरात यावर्षी चिमुकल्या पावलांचे आगमन झाले आहे.

नकुल मेहता (Nakuul Mehta)
नकुलने २०१२ मध्ये टेलिव्हिजन अभिनेत्री जानकी पारेखशी लग्न केले. या वर्षी फेब्रुवारीमध्ये दोघांना मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी सूफी ठेवले. सूफी आता १० महिन्यांचा आहे. सुफीचे सोशल मीडियावर वेगळे इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे. (Celebrities who become parents 2021)

किश्वर मर्चंट (Kishwar Merchant)
किश्वर आणि टेलिव्हिजन अभिनेता सुयश राय यांनी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर, २०१६ मध्ये लग्न केले. या वर्षी ऑगस्टमध्ये दोघांना मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी निर्वैर ठेवले.

मोहित मलिक (Mohit Malik)
मोहित मलिक आणि त्याची पत्नी आदितीच्या घरी, लग्नाच्या एकूण १० वर्षानंतर एक चिमुकला पाहुणा आला. या वर्षी एप्रिलमध्ये आदिती आणि मोहित एका मुलाचे पालक झाले, ज्याचे नाव त्यांनी एकबीर ठेवले.

शाहीर शेख (Shahir Sheikh)
टेलिव्हिजन अभिनेता शाहीर शेखने गेल्या वर्षी रुचिका कपूरसोबत लग्न केले. या वर्षी सप्टेंबरमध्ये दोघांना मुलगी झाली, जिचे नाव त्यांनी अनाया ठेवले.

अनिता हसनंदानी (Anita Hassanandani)
‘नागिन’ अभिनेत्री अनिता आणि तिचा पती रोहित रेड्डी देखील या वर्षी फेब्रुवारीमध्ये आई-वडील झाले. या दोघांना एक मुलगा झाला, ज्याचे नाव त्यांनी आरव ठेवले. लग्नाच्या ८ वर्षानंतर अनिता आणि रोहित आई-वडील झाले.

चारू असोपा-राजीव सेन (Charu Asopa- Rajeev Sen)
या वर्षी नोव्हेंबरमध्ये अभिनेत्री चारू असोपा आणि तिचा पती राजीव सेन यांच्या घरी मुलीचा जन्म झाला. दोघांनी मुलीचे नाव जियाना ठेवले आहे.

हेही वाचा :

हेही पाहा-

हे देखील वाचा