Friday, April 26, 2024

अभिनेता शाहीर शेख झालाय बाबा, पत्नीसोबतचा फोटो शेअर करत उघड केले मुलीचे नाव

सध्या सर्वत्र ‘पवित्र रिश्ता २.०’ ची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या मालिकेच्या पहिल्या पर्वातील अर्चना आणि मानव ही जोडी सुपरहिट जोडी ठरली होती. अभिनेत्री अंकिता लोखंडेने अर्चनाची भूमिका साकारली होती, तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने मानवची भूमिका साकारली होती. या मालिकेच्या दुसऱ्या पर्वात अभिनेता शाहीर शेख मानवची भूमिका साकारणार आहे.

अभिनेता शाहीर शेखचा आनंद सध्या गगनात मावेनासा झाला आहे. त्यामागे दोन कारणं आहे. पहिले म्हणजे तो सुप्रसिद्ध मालिका ‘पवित्र रिश्ता २.०’ मध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे मागील काही दिवसांपूर्वीच त्याला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे तो सध्या खूप आनंदी आहे. अभिनेता शाहीर शेख आणि रुचिका कपूर यांना १० सप्टेंबर रोजी मुलगी झाली असून, आता ते आई- बाबा झाले आहेत. नुकतेच शाहीरने पोस्ट शेअर करत आपल्या मुलीचे नाव देखील उघड केले आहे. शाहीरने बेबी शॉवर दरम्यान स्वतःचा आणि पत्नी रुचिकाचा एक फोटो शेअर केला आहे.

हा फोटो पोस्ट करत शाहीरने लिहितो की, “मी सध्या स्वत:ला खूप भाग्यवान समजत आहे, कारण ही मला आयुष्यात मिळालेली सर्वात मोठी भेट आहे. मी कृतज्ञतेने भरलेला आहे…. पुढील प्रवासासाठी तुमच्या सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छा हव्या आहेत. #अनाया.” शाहीरने या फोटो पोस्टद्वारे आपल्या सर्व चाहत्यांना आपल्या मुलीचे नाव ‘अनाया’ सांगितले आहे. त्याचबरोबर अजूनही रुचिका आणि शाहीर यांनी त्यांच्या मुलीची झलक चाहत्यांना दाखवली नाही.

अभिनेता शाहीर शेख हा टीव्ही इंडस्ट्रीचा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याचबरोबर त्याने मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात रुचिका कपूरसोबत कोर्ट मॅरेज केले होते. माध्यमांतील वृत्तानुसार, शाहीर आणि रुचिका यांना त्यांच्या जवळच्या लोकांसाठी जम्मूमध्ये एक समारंभ आयोजित करायचा होता. परंतु कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. त्यानंतर जेव्हा रुचिकाचे बेबी शॉवर करण्यात आले, तेव्हा टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी आपली उपस्थिती नोंदवली होती. यामध्ये अभिनेत्री क्रिस्टल डिसूझा आणि रिद्धी डोगराची यांची नावे समोर आली होती.

 

 

हे देखील वाचा