आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो

TV Actress Anita Hassanandani And Rohit Reddy Blessed With Baby Boy


प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री अनिता हसनंदानी आणि पती रोहित रेड्डी यांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. अनिताने मंगळवारी (९ फेब्रुवारी) एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याची माहिती रोहितने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे चाहतेही भलतेच खुश झाले आहेत.

रोहितने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्वत:चा आणि पत्नी अनिताचा एक फोटो शेअर करत लिहिले आहे की, ‘आम्हाला मुलगा झाला आहे.’ रोहितच्या या पोस्टनंतर शुभेच्छांचा पाऊस पडत आहे.

अनिताने यापूर्वी ऑक्टोबर २०२०मध्ये आपल्या चाहत्यांना गरोदरपणाची बातमी दिली होती.

अनिताने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले होते की, ती आई बनणार आहे. ही पहिली वेळ होती, जेव्हा अनिताने बेबी बंपची माहिती दिली होती. यानंतर अनिताने आपल्या गरोदरपणाचा पूर्ण प्रवास आपल्या चाहत्यांसह शेअर केला होती.

काही दिवसांपूर्वी अनिताने आपल्या गरोदरपणाबद्दल म्हटले होते की, ‘मी माझ्या तिमाहीत आहे. डिलिव्हरीची तारीख लवकरच येणार आहे. मी खूप उत्साही आहे आणि चिंतेतही आहे. अनेक प्रकारच्या भावना माझ्यात यावेळी येत आहेत. मी आयुष्यातील या नवीन पर्वासाठी तयार आहे. बाळाच्या येण्याची खूप आतुरतेने वाट पाहत आहे.’

खरं तर अनिताने सन २०१३ मध्ये उद्योजक रोहित रेड्डीसोबत संसार थाटला होता. अनिताने अनेक चित्रपटांंमध्ये आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. निर्माता एकता कपूरच्या ‘नागिन’ या मालिकेतील तिने साकारलेली भूमिका चाहत्यांना खूप भावली. अनिताची चित्रपट कारकीर्द खूप काही खास ठरली नाही, परंतु ती टीव्ही इंडस्ट्रीमध्ये चांगलीच यशस्वी झाली आहे. अनिता ‘ये है मोहब्बतें’, ‘काव्यांजली’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि ‘कसम’ यांसारख्या मालिकांचा भाग राहिली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-हिट झालेल्या सिनेमाचे श्रेयही राजीव कपूर यांना मिळाले नाही, वडिल राज कपूर यांनीही दिली नव्हती साथ
-‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनीपासून ते करीना कपूरपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी केलंय विवाहित पुरुषांशी लग्न; वाचा कोणाकोणाचा आहे समावेश
-शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते
-‘भाऊ, तेवढंच काम राहिलंय आता…’, सोनू सूदकडे चाहत्याने केली अशी तक्रार की अभिनेत्याने तिथेच जोडले हात
-द लेजेंड हनुमान  सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित, जाणून घ्या कोणता रोल निभावतो मराठमोळा शरद केळकर?


Leave A Reply

Your email address will not be published.