चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे काम करता करता एकमेकांच्या प्रेमात पडले. केवळ प्रेमात न पडता त्यांनी लग्न करून एकमेकांना आयुष्याचे जोडीदार म्हणून देखील निवडले. याच यादीतील एक जोडी म्हणजे सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर. दोघेही मराठी चित्रपटसृष्टीतील कमालीचे कलाकार आहेत. अनेक चित्रपटात यांनी एकत्र देखील काम केले.
रील लाईफमध्ये रोमान्स करता करता ते कधी एकमेकांच्या प्रेमात पडले, हे त्यांना देखील समजले नाही आणि तिथूनच त्यांच्या प्रेमाचा प्रवास सुरू झाला. पुढे लग्नापर्यंत जाऊन याच सुखी संसाराला मंगळवारी (२१ डिसेंबर) रोजी ३६ वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त त्यांची एकुलती एक लेक श्रिया पिळगावकर हिने सोशल मीडियावर त्यांचे काही फोटो शेअर करून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Sachin pilgaonkar and supriya pilgaonkar 36 th wedding anniversary, shriya give best wishesh)
श्रियाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, एका फोटोमध्ये ते तिघेही दिसत आहे. दुसरा सचिन आणि सुप्रिया यांचा लेटेस्ट फोटो आहे, तर तिसऱ्या फोटोत सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांचा ‘अशी ही बनवा बनवी’ चित्रपटातील फोटो आहे.
हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “सहजीवनाची तसेच रील आणि रियल आयुष्याची ३६ वर्ष. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या पोटी जन्म घेतला ही माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे.” अशाप्रकारे तिने तिच्या आई वडिलांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून सचिन आणि सुप्रिया यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. या पोस्टवर सोनाली बेंद्रे, संजय कपूर यांनी कमेंट केल्या आहेत. त्यांचे लग्न २१ डिसेंबर १९८५ मध्ये झाले आहे.
सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्यांनी ‘अशी ही बनवा बनवी’, ‘एकुलती एक’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘आम्ही सातपुते’, ‘माझा पती करोडपती’ या चित्रपटात काम केले आहे.
हेही वाचा :
‘देसी गर्ल’ गाण्यावर दोन मुलींनी केला धमाल डान्स, खुद्द प्रियांका चोप्राने केले डान्सचे कौतुक
Pushpa: चित्रपटातील अडल्ट सीनमुळे प्रेक्षक झाले नाराज, निर्मात्यांना घ्यावा लागला मोठा ‘हा’ निर्णय