Sunday, June 4, 2023

Pushpa: चित्रपटातील अडल्ट सीनमुळे प्रेक्षक झाले नाराज, निर्मात्यांना घ्यावा लागला मोठा ‘हा’ निर्णय

अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) अभिनित ‘पुष्पा: द राइज – पार्ट १’ने (Pushpa: The Rise Part 1) केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाहीत, तर बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त धमाल केली आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत २०० कोटींचा व्यवसाय केला आहे. ७ डिसेंबर २०२१ रोजी ५ भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील प्रत्येक पात्राचे प्रेक्षक कौतुक करत आहेत.

या दाक्षिणात्य चित्रपटाचे हिंदी व्हर्जन पाहून अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांच्या अभिनयाला उत्तर भारतातील प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, इथे आम्ही तुम्हाला ‘पुष्पा’विषयी एक महत्त्वाची माहिती सांगत ​​आहोत, ज्याबद्दल तुम्हा कोणाला माहिती नसेल. (an adult scene between allu arjun and rashmika mandanna in pushpa trimmed in new show)

अडल्ट सीनमुळे प्रेक्षक नाराज
खरं तर, ‘पुष्पा’च्या निर्मात्यांना एका झटक्याचा सामना करावा लागत आहे. कारण चित्रपटात एक सीन असा आहे, जो तुम्ही कुटुंबासोबत बसून पाहू शकत नाही. या अडल्ट सीनमुळे चित्रपटाबाबत ऑनलाइन वाद निर्माण झाला आहे. हा तो सीन आहे, ज्यात श्रीवल्ली या पात्रातील रश्मिका मंदाना, पुष्पा राज म्हणजेच अल्लू अर्जुनबद्दलच्या तिच्या भावना व्यक्त करते. या सीनमध्ये पुष्पा राज गर्लफ्रेंड श्रीवल्लीच्या छातीला स्पर्श करताना दिसत आहे आणि ते त्याच्याबद्दलच बोलतानाही दाखवले आहेत.

हटवला गेला सीन
असे सांगितले जात आहे की, ‘पुष्पा’चा तो सीन काढून टाकण्याचा निर्णय चित्रपट निर्मात्याने घेतला आहे. कारण तो प्रौढ रेट केलेला कंटेंट आहे आणि त्यामुळे चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहताना कौटुंबिक प्रेक्षक अस्वस्थ होऊ शकतात. चित्रपटाचे ट्रिम केलेले व्हर्जन २० डिसेंबरपासून थिएटरमध्ये सुरू झाले आहे. ‘पुष्पा’च्या तीन तासांच्या कालावधीमुळे चित्रपटातील आणखी काही सीन कमी केली जाऊ शकतात, असेही बोलले जात आहे.

‘पुष्पा: द राईज’चे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून, चित्रपटाची कथा आंध्र प्रदेशातील शेषाचलम हिल्समधील लाल चंदन तस्करांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचा दुसरा भाग २०२२ मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा