सविता बजाज यांच्या मदतीला धावल्या सुप्रिया पिळगावकर; अभिनेत्रीला केले आयसीयूमध्ये दाखल


कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर आणि लोकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. कोरोनाचा सर्वात मोठा फटका बसला तो मनोरंजन क्षेत्राला. कोरोनामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन रखडले, शूटिंग बंद झाल्यामुळे अनेक लहान मोठे कलाकार बेरोजगार झाले. तसेच आर्थिक संकटात सापडले. अनेक टीव्ही, चित्रपटातील कलाकारांना या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी ‘नदिया के पार’ चित्रपटातील अभिनेत्री असलेल्या सविता बजाज यांना देखील आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच ही बातमी आली होती. आता त्यांच्या मदतीसाठी हिंदी आणि मराठीमधील अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर पुढे आल्या आहेत.

सध्या नुपूर अलंकार ही अभिनेत्री सविता बजाज यांच्याकडे लक्ष देत आहेत. सविता बजाज यांच्याविषयी सुप्रिया पिळगावकर यांना जेव्हा समजले, तेव्हा लगेचच त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. सुप्रिया यांच्यासोबत CINTAAचे देखील काही मेंबर्स सविता बजाज यांची मदत करत आहेत. या मदतीमुळे त्यांना हॉस्पिटलचे बिल भरता येणार आहे. अभिनेत्री नुपूर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “सविता खूप स्वाभिमानी आहेत. अनेक मीडियाकर्मींच्या सांगण्यावरून त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले आहे. त्यांना आयसीयूमध्ये ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.”

वाढत्या वयाबरोबर सविता यांचे आजारपण देखील वाढत आहे. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “मला श्वसनाचा आजार आहे, या परिस्थितीत मी कसं जगावे हे मलाच कळत नाही, माझी काळजी घेण्यासाठी माझ्या घरी कोणी नाही. माझ्या कुटुंबीयांनी माझा स्वीकार केला नाही. २५ वर्षापूर्वी मी दिल्लीमध्ये माझ्या घरी राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी माझ्याच कुटुंबीयांनी मला माझ्या घरी राहण्यास नकार दिला. मी आजपर्यंत चित्रपट, मालिकांमधून बरेच कमावले, अनेकांची सुद्धा मदत केली, पण आज माझीच मदत करायला कोणी नाही.”

सध्या त्यांना CINTAA कडून ५०००, तर रायटर्स असोसिएशनकडून २००० रुपये मिळत आहेत. यावरच त्या त्यांचा खर्च भागवतात.

त्यांच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. त्यांनी जपून ठेवलेल्या पैशांवर आतापर्यंत त्यांनी कसेबसे दिवस काढले. परंतु आता त्यांच्या वाढत्या वयाबरोबरच वाढत्या आजारपणाचा उपचार करण्यासाठी पैसेच उरले नाहीत. तीन महिन्यांपूर्वीच त्यांना कोरोनाने घेरलं असल्यानं २२ दिवसांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास


Leave A Reply

Your email address will not be published.