बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानचा (Kareena Kapoor Khan) कोव्हिड १९ रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, जो अभिनेत्रीने स्वतः तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. अशा परिस्थितीत आता ख्रिसमसच्या निमित्ताने करीनाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती आपल्या कुटुंबासोबत ख्रिसमस लंचसाठी बाहेर पडली आहे. व्हायरल भयानीने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये करीना सैफ अली खान आणि तैमूर आणि जेह या दोन्ही मुलांसोबत दिसत आहे.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, करीना आणि सैफ मुलांसोबत त्यांच्या कारमधून बाहेर येतात आणि पॅपराझींना काही वेळ पोझही देतात. यावेळी करीनाचे सौंदर्य पाहून कोणीही तिच्या प्रेमात पडेल. काही चाहत्यांनी पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये असेही म्हटले होते की, कोव्हिडनंतर करीनाचे वजन कमी झाले आहे आणि ती आणखी सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर काही चाहते जेहच्या क्यूटनेसचे कौतुक करतानाही दिसले. व्हिडिओवर कमेंट करताना एका चाहत्याने लिहिले की, “देवाचे आभार, तू ठीक आहेस. गॉड ब्लेस यू.”
जेव्हा कोव्हिडचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तेव्हा अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले की, “माझा कोव्हिड १९ चा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मला माझ्या बहिणीचे आभार मानायचे आहेत, जिने मला या भयानक स्वप्नातून बाहेर येण्यास मदत केली. माझी सर्वात चांगली मैत्रीण अमृता, आम्ही ते करून दाखवले. माझे प्रिय मित्र आणि कुटुंब, माझी पूनी, नैना आणि माझ्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्वांचे आभार. माझ्या सर्व चाहत्यांना त्यांच्या संदेशांसाठी धन्यवाद. सक्रिय राहून सर्व वेळ मदत केल्याबद्दल बीएमसीचे आभार. यासोबतच एसआरएल लॅब्स जे सर्वोत्कृष्ट होते. शेवटी इतका वेळ हॉटेलच्या खोलीत कैद झालेला माझा पती सैफ, तोही इतक्या सहनशीलतेने, कुटुंबापासून दूर राहिला.”
करीनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आमिर खानही दिसणार आहे. हा चित्रपट अद्वित चंदन यांनी दिग्दर्शित केला आहे, हा चित्रपट एप्रिल २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा-
- ‘लुट गये’ ते ‘पानी-पानी’पर्यंत, २०२१मध्ये आलेल्या ‘या’ गाण्यांनी युट्यूबवर घातला धुमाकूळ; मिळवले कोट्यवधी व्ह्यूज
- नुसरत जहाँने ख्रिसमसच्या निमित्ताने मुलासोबत फोटो केला शेअर; म्हणाली ‘हा फक्त एक सीझन नाही, तर…’
- जेव्हा भरगर्दीत सोनाक्षी सिन्हाला चुकीच्या जागेवर स्पर्श करू लागले काही लोक, ढसा ढसा रडली अभिनेत्री










