छोट्या पडद्यावर आपल्याला अनेक ऑनस्क्रीन जोड्या पाहायला मिळतात. वेगवेगळ्या मालिकेतील अनेक कलाकार त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगले मित्र असतात. झी मराठीवरील दोन मालिका चांगल्याच गाजल्या होत्या. ‘लागिर झालं जी ‘ आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’. या दोन्ही मालिकांना प्रेक्षकांना अगदी डोक्यावर घेतले होते. मालिकांची कहाणी देखील वेगळी होती. ‘लागिर झालं जी’, मालिका देशभक्तिवर आणि आर्मिवर आधारित होती. मालिकेत प्रेमकहाणी जरी दाखवली असली, तरी देखील मालिकेचा मूळ सार देशसेवा हाच होता.
तसेच ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका दैनंदिन जीवनावर आधारित होती. अशातच या मालिकांमधील एक नायक आणि दुसऱ्या मालिकेतील एक खलनायिकेचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘लागिर झालं जी’ मालिकेतील आज्या म्हणजेच नितीश चव्हाण आणि ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेतील शनाया म्हणजेच रसिका सुनील यांचा एक डान्स व्हिडिओ समोर आला आहे. (Nitish chavhan and Rasika Sunil’s dance video viral on social media)
रसिका आणि नितीश या दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ते दोघेही ट्रेडिंग ‘सजना’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडिओ पाहून ते दोघे नक्कीच आगामी काळात कोणत्यातरी प्रोजेक्टमध्ये दिसणार आहेत, असा अंदाज त्यांचे चाहते लावत आहेत.
त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. टेलिव्हिजनवरील या लाडक्या कलाकारांना एकत्र पाहून सगळ्यांना खूप आनंद झाला आहे. अनेकजण कमेंट करून त्यांच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत आहेत.
रसिका सुनील हिने २०२१ मध्ये तिचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीसोबत लग्न केले आहे. त्यानंतर ती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत राहिली आहे. तसेच नितीश देखील त्याचा आगामी चित्रपट ‘मजनू’मध्ये दिसणार आहे. त्यामुळे तो देखील सध्या चर्चेत आहे.
हेही वाचा :
…म्हणून योगिता तिचे लाल रंगाचे कपडे कधीही घालते, सोशल मीडियावरील ‘ती’ पोस्ट आली चर्चेत
नवीन वर्षाच्या रात्री नेहा कक्कर अन् रोहनप्रीतमध्ये घडले ‘असे’ काही, की स्टेजवरच गायिकेला कोसळले रडू