बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री दीपिका पदुकोण बुधवारी (५ जानेवारी) रोजी तिचा वाढदिवस साजरा करत आहे. याआधी अशी बातमी समोर आली होती की, दीपिका तिच्या वाढदिवसाचे ग्रँड सेलिब्रेशन तिच्या ‘गहराइया’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इव्हेन्टला करणार आहे. तिचा हा इव्हेंट अलिबागमध्ये आयोजित केला होता. परंतु अशातच नवीन माहिती समोर आली आहे की, ट्रेलर लॉन्चसोबत दीपिकाने तिचा वाढदिवस साजरा करण्याचा बेत देखील रद्द केला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने तिने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तिने चित्रपटाचा लॉन्च इव्हेंट देखील रद्द केला आहे. ती आता तिचा पती रणवीर सिंगसोबत मालदीवमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली आहे. तिथे ते दोघे वाढदिवस साजरा करून क्वालिटी टाइम घालवणार आहेत. (deepika padukone birthday grand celebrtion plan cancelled due to this reason)
मुंबईमध्ये वाढता कोरोनाचा प्रभाव यामुळेच तिने हा निर्णय घेतला आहे. सध्या कोरोनाच संकट हळू- हळू कमी होऊन मनोरंजन क्षेत्र पुन्हा नव्या जोमात कामाल लागले होते. अनेक नवीन सिनेमे चाहत्यांना भेटीसाठी येणार होते. परंतु आता ओमीक्रॉनचा वाढतात संसर्ग आणि त्याचा परिणाम पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्राला होताना दिसत आहे. सरकारी नियम प्रतिबंधनामुळे अनेक पार्ट्या, इव्हेंट रद्द झालेले आपल्याला दिसत आहेत. याच कारणामुळे दिपकाचा वाढदिवस आणि त्याच दिवशी येणाऱ्या ‘गहराइया’ या सिनेमाचा प्रोमो लॉन्च हा रद्द झाला आहे.
बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. यात अर्जुन कपूर, सोनू निगम, अनीता राज, करीना कपूर खान, अमृता अरोरा, प्रेम चोपरा, मृणाल ठाकुर यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे. त्यामुळे मनोरंजन क्षेत्रावर पुन्हा एका नव्याने प्रतिबंध लागण्याची शक्यता अनेकजण व्यक्त करत आहेत.
हेही वाचा :
मायरा वैकुळने ‘केळेवाली’ गाण्यावर केला असा डान्स की, सोनाली कुलकर्णीने देखील केली भन्नाट कमेंट