Friday, November 14, 2025
Home बॉलीवूड अखेर सुशांतसिंग राजपूत केसमध्ये त्याच्या जवळच्या मित्राला अटक, नवीन खुलासे होण्याची शक्यता

अखेर सुशांतसिंग राजपूत केसमध्ये त्याच्या जवळच्या मित्राला अटक, नवीन खुलासे होण्याची शक्यता

मागच्या वर्षातली सर्वात धक्कादायक घटना म्हणजे सुशांतसिंग राजपूतचा मृत्यू. १४ जूनला सुशांतसिंग त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याच्या मृत्यूबद्दल अनेक तर्क-वितर्क सुरू झाले आणि शेवटी पोलिसांनी त्याच्या मृत्यूच्या चौकशीला सुरुवात केली. यातून अनेक चक्रावणारे खुलासे समोर येऊ लागले.

अनेक मोठ्या विभागांनी या केसमध्ये काम केले. त्यात मुंबई पोलीस, बिहार पोलीस, NCB , CBI आदी विभागांचा समावेश होता. त्यातल्या NCB ने मागच्या काही महिन्यांपूर्वी सुशांतचा जवळचा मित्र असलेल्या ऋषिकेश पवारला समन बजावला होता. मात्र, त्यानंतर ऋषिकेश अचानक गायब झाला. पोलीस मागील काही महिन्यांपासून त्याच्या मागावर होते, अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

सुशांतला ड्रग्ज पुरवण्याच्या आरोपाखाली त्याला समन बजावण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान अनेक अमली पदार्थ तस्करांची नावे समोर आली होती. यात बॉलिवूडमधील कलाकारांना अमली पदार्थ पुरविणाऱ्यांसोबतच काही कलाकारांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. याच प्रकरणात आता सुशांतचा मित्र आणि सहाय्यक दिग्दर्शक ऋषिकेश पवारचाही समावेश होता. मात्र, तो त्याला समन बाजवल्यानंतर गायब होता.

सुशांत केसच्या चौकशीसाठी ऋषिकेशला पोलिसांनी अनेक समन दिले, पण तो आला नाही त्यानंतर त्याच्या घरी देखील पोलिसांची टीम जाऊन आली मात्र तो नव्हता. त्यानंतर त्याला फरार जाहीर केले होते. त्यानंतर मंगळवारी (२ फेब्रुवारी) तो पोलिसांच्या हाती लागला आहे. आता ऋषिकेशच्या चौकशीतून काय काय गोष्टी बाहेर येतील हे पाहणे औसूक्त्याचे ठरेल.

हेही वाचा-

कधीही न पाहिलेले व्हिडीओ! सुशांतच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अंकिताने शेअर केले दोन व्हिडीओ

केदारनाथच्या दिग्दर्शकाने सांगितली सुशांतची आठवण. ‘मी माझे जग व्यापत आहे’ असे म्हणत…

सुशांतच्या केस संदर्भात शेखर सुमनला का विचारले जातायत प्रश्न? जाणून घ्या काय आहे प्रकरण

हे देखील वाचा