Friday, September 11, 2026
Home अन्य सुशांतच्या केस संदर्भात शेखर सुमनला का विचारले जातायत प्रश्न? जाणून घ्या काय आहे प्रकरण

सुशांतच्या केस संदर्भात शेखर सुमनला का विचारले जातायत प्रश्न? जाणून घ्या काय आहे प्रकरण

सुशांतसिंग राजपूत याचा मृत्यू एक रहस्य बनला आहे. सुशांतसिंगच्या केसचा तपास सी.बी.आय. कडे सोपवला गेला. मात्र अजूनही कोणतेच सत्य समोर आले नाही. सुशांतसिंग केसचा तपास सी.बी.आय. सोबत एनसीबी, ईडी सारख्या एजन्सी सुद्धा करत होत्या पण ते देखील काहीच निष्कर्ष काढू शकले नाही.

याच संदर्भात अभिनेते शेखर सुमन यांनी नुकतेच एक ट्विट करत सुशांच्या केसचा तपास कुठंपर्यंत पोहचला आहे असा प्रश्न विचारला आहे. या ट्विट मध्ये शेखर म्हणतात, ” मला अनेक जण भेटतात आणि सुशांतच्या केस संदर्भात प्रश्न विचारतात. त्यावर मी त्या उत्तर देतो की, काश माझ्याकडे या प्रश्नचे उत्तर असते. आता आपण फक्त सर्व ठीक होईल अशी आशा बाळगून देवाकडे प्रार्थना करू शकतो. सी.बी.आय.ने लवकरच सुशांतच्या या रहस्यमयी मृत्यूचा छडा लावावा. सी.बी.आय.ने लवकरच सुशांतच्या मारेकऱ्यांना अटक करावी.”

या ट्विटच्या आधी सुद्धा शेखर यांनी अजून एक ट्विट केले होते ज्यात त्यांनी लिहीले होते, “वृत्तपत्रे, न्यूज चॅनेल्स यावरून सुशांतच्या केस संदर्भात येणाऱ्या बातम्या अचानक गायब झाल्या. कुठेच कोणतीच या केसची चर्चा होताना मला दिसत नाहीये. आम्ही आमची एकटी लढाई आता लढत आहोत. मला यासाठी राग येत आहे की हळू हळू आपण या केस पासून आणि आपल्या लक्ष्यापासून दूर जात आहोत.”

एका ट्विट मध्ये त्यांनी म्हटले होते,  “सी.बी.आय. आणि इतर एजन्सी देखील पुरावा न मिळाल्याने शांत झाल्या आहेत. या अनेक दिवस तपास करून सुद्धा या तपास यंत्रणांकडे कोणतेच निष्कर्ष नाहीये. या यंत्रणांचे अधिकारी
सुद्धा कोणतीच माहिती देत नाही.”

या वर्षी १४ जून रोजी सुशांत त्याच्या घरात मृत अवस्थेत आढळला होता.

हे देखील वाचा