सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला अनेक महिने झाले असले तरी त्याच्या जवळच्या लोकांसाठी ही घटना अजूनही तितकीच ताजी आहे. सुशांतने त्याच्या छोट्या करियरमध्ये अनेक चांगले सिनेमे केले. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे ‘केदारनाथ’. नुकतंच ‘केदारनाथ’ चित्रपटाला २ वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे या चित्रपटाचा दिग्दर्शक अभिषेक कपूरने ट्विट करत सुशांतच्या आठवणींना उजाळा दिला.
अभिषेकने त्याच्या ट्विटमध्ये लिहले, ” द्वंद्व दोनों लोक में विषामृत पे था छिड़ा। अमृत सभी में बांट के, प्याला विष का तूने ख़ुद पिया। नमो नमो जी शंकरा, भोलेनाथ शंकरा। सोबतच अभिषेकने 2 Years Of Kedarnath आणि 2 Years Of SSR as Mansoor असे होणं हॅशटॅग सुद्धा दिले आहेत.” या ट्विट सोबत अभिषकने सुशांतचे दोन फोटो देखील ट्विट केले आहे.
अभिषेकने अजून एक ट्विट केले ज्यात त्याने सुशांतच्या हाताचा फोटो शेयर केला आहे. सुशांतच्या हातावर पेनने काहीतरी लिहले आहेत. मी जेव्हा सुशांतला ‘केदारनाथ’ सिनेमाची कथा ऐकवली, तेव्हा ‘मन्सूर’ बद्दल चर्चा करत असताना तो त्याच्या हातावर काही लिहीत होता. तेव्हा मी तिला विचारले हे काय आहे? त्यावर तो म्हणाला ‘मी माझे जग व्यापत आहे.’
सुशांतने अभिषेक कापूरच्याच ‘काय पो चे’ सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘केदारनाथ’ सिनेमात सुशांतने मन्सूर नावाच्या पिट्टूची भूमिका साकारली होती. शिवाय याच सिनेमातून सारा अली खानने सिनेसृष्टीत प्रवेश केला. हा सिनेमा जरी एक रोमँटिक चित्रपट असला तरी मुख्य कथा की केदारनाथला आलेल्या प्रलयाची होती. हा हित्रपट प्रेक्षकांना खूप भावला.