Friday, June 26, 2026
Home कॅलेंडर बापरे बाप.!! रागाने लाल झालेले शशी कपूर शत्रुघ्न सिन्हा यांच्यामागे चक्क पट्टा घेऊन धावले होते; वाचा कधीही न ऐकलेला किस्सा

बापरे बाप.!! रागाने लाल झालेले शशी कपूर शत्रुघ्न सिन्हा यांच्यामागे चक्क पट्टा घेऊन धावले होते; वाचा कधीही न ऐकलेला किस्सा

शत्रुघ्न सिन्हा हे सध्या चित्रपटाच्या पडद्यापासून दूर असले, तरीही बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक मानले जातात. शत्रुघ्न सिन्हा यांनी अनेक सुपरहिट चित्रपट बनवले असून अनेक चित्रपटांमध्येही कामही केले आहे.

त्यांचे बर्‍याच कलाकारांसोबत मैत्रीचे किस्सेही खूप मजेदार आहेत. आता शत्रुघ्न सिन्हा यांनी ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांच्यासोबत घडलेले किस्से शेअर केले आहेत. शशी कपूर यांच्या आठवणीत त्यांनी सांगितलेल्या मजेदार किस्स्यांमध्ये, ते एकदा शशी त्यांना बेल्टने मारण्यासाठी त्यांच्या मागे पळाले होते.

शत्रुघ्न सिन्हा यांनी शशी कपूरसोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. नुकतेच शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत चित्रपटाच्या प्रवासाबद्दल बरीच चर्चा केली. बरेच मजेदार किस्सेही त्यांनी शेअर केले. शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले की, एकदा शशी कपूर त्यांना मारण्यासाठी बेल्ट घेऊन त्यांच्या मागे धावले, पण मस्तीमध्ये!

Shatrughna Sinha & Shashi kapoor
Photo Courtesy: YouTube/Sreengrabh/Bollywood Movie

त्यांनी सांगितले की, ‘एकदा मी सेटवर उशीरा पोहचलो आणि शशी माझी वाट बघत होते. अशा परिस्थितीत ते मला मारण्यासाठी बेल्ट घेऊन माझ्यामागे धावत होते. त्यावेळी मी त्यांना सांगितले की, मी वक्तशीर आहे आणि माझ्याकडे खूप टॅलेंट आहे. त्यामुळे चित्रपटनिर्माते मला कास्ट करतात. त्यावर ते म्हणाले की, ‘हे सांगायला तुला अजिबात लाज वाटत नाही का’. पण या सर्व गोष्टी मजेत घडल्या.’

पुढे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, ‘हो मी सेटवर उशीरा पोहचायचो. पण मी कधी मुद्दाम उशीर केला नाही. मला वाटायचे की, सेटवर जाण्यापूर्वी माझा योगा पूर्ण झाला पाहिजे. योगा करायला मला वेळ लागायचा, ज्यामुळे मला सेटवर जायला उशीर व्हायचा.’

‘कधीकधी मी रात्रीच्या 9 वाजताच्या शिफ्टमध्ये 12 वाजता पोहोचत असे. माझी स्मरणशक्ती खूप वेगवान आहे. त्यामुळे मी एकदा ओळी वाचल्या तरी माझ्या लक्षात राहत असे. आणि मी एका वेळातच शॉट पूर्ण करत असे. मी माझ्या काळातील वन टेक आर्टिस्ट होतो. म्हणून कोणत्याही निर्मात्याने माझ्या उशीरा येण्यासाठी तक्रार केली नाही. जर माझे काम वाईट असते तर त्या लोकांनी मला पुन्हा कास्ट केले असते का?’

shatrughan sinha
Photo Courtesy : Instagram/shatrughan sinha

शत्रुघ्न सिन्हा यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबतचाही एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले, ‘एकदा मी अमिताभबरोबर शूटिंग करत होतो आणि सेटवर पोहोचण्याची वेळ पहाटे साडेचार वाजता होती. मी त्याच वेळी तेथे पोहोचलो. कोलकाता येथे चित्रित होणार्‍या या चित्रपटाचे नाव ‘अंतरजली जत्रा’ होते.’

‘मी वेळेवर आलो होतो आणि शूटिंगही वेळेवर संपवले. त्यांच्याकडे ‘शोले’, ‘दीवार’, ‘अचानक’ आणि ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या, पण त्यांना हे चित्रपट करता आले नाहीत’ असेही अभिनेते सिन्हा यांनी सांगितले.

हे देखील वाचा