प्रत्येक व्यक्तीला भावना असतात. आपल्याला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आपण अनेकदा व्यक्त होतो. चांगल्या- वाईट गोष्टींवर आपले भाव नक्कीच बदलतात. जर आपण एखाद्या गरीब व्यक्तीला पाहिले, तर आपल्या मनात त्याच्याबद्दल दया येते आणि आपण त्यांची मदत करण्याचा पुरेपूर प्रयत्नही करतो. असे काही कलाकार बॉलिवूडमध्येही आहेत. असेच काहीसे आता बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्माने केले आहे. ती ख्रिसमसचे एक शूट करत होती. त्यादरम्यानच एका समोसे विकणाऱ्या व्यक्तीशी तिची भेट होते. त्यावेळी ती त्या व्यक्तीची समस्या एका झटक्यातच सोडवते.
ख्रिसमस साजरा करण्यासाठी पोहोचली होती अदा
सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या आघाडींच्या अभिनेत्रींमध्ये अदा शर्माचे (Adah Sharma) नाव घेतले जाते. नुकतेच तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ती ख्रिसमसचे शूट करत असते. तेव्हाच तिची भेट एका समोसा विकणाऱ्या व्यक्तीशी होते. समोसा विकणारा व्यक्ती अभिनेत्रीला म्हणतो की, सकाळपासून माझा एकही समोसा विकला गेला नाही. माझे वय ७३ वर्षे आहे आणि मला हृदयाचा त्रास आहे. यासोबतच ती व्यक्ती अदा शर्माला आपली मुलगी म्हणतो. यामुळे अभिनेत्रीही भावुक होते.
सर्वांसाठी विकत घेतले समोसे
जेव्हा अदा शर्माने वृद्ध व्यक्तीच्या तोंडून आपल्यासाठी मुलगी हा शब्द ऐकला, तेव्हा तिने समोसे विकत घेण्याचे ठरवले. तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला अभिनेत्री ‘समोसे कोण खाणार?’ असे विचारते. समोसा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्यांनी अभिनेत्रीला समोसा खाणार असल्याचे सांगितले. त्यानंतर अदा सर्वांसाठी समोसे खरेदी करते. तसेच, अदा प्लास्टिक पिशव्या घेण्यास नकार देते. ती स्वतःही समोसे खातात. अदा समोसे विकणाऱ्या वृद्ध व्यक्तीला त्याचे नाव विचारते. त्यावेळी तो वृद्ध व्यक्ती आपलं नाव सांगताना ‘रेड्डी’ म्हणतो. यानंतर अभिनेत्री तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांसोबत सेल्फी देखील घेते. अदाच्या या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच ४० हजारांपेक्षा अधिक लाईक्सही मिळाले आहेत.
हेही पाहा: कुणाचा व्हिडिओ गाजला, तर कुणाचा नवा चित्रपट येतोय; पाहा काय काय घडलंय
अदाची कारकीर्द
अदाने २००८ मध्येच तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने विक्रम भट्टच्या ‘१९२०’ या भयपट चित्रपटात काम केले, तेव्हा ती केवळ १६ वर्षांची होती. नंतर हिंदी चित्रपट काही चालत नसल्यामुळे ती दाक्षिणात्य सिनेसृष्टीत गेली. आता ती हिंदी आणि दाक्षिणात्य अशा दोन्ही सिनेसृष्टीत काम करते. तिने ‘कमांडो २’ आणि ‘कमांडो ३’ या दोन्ही हिंदी चित्रपटात काम केले आहे.
अदाने हिंदीव्यतिरिक्त ‘हार्ट अटॅक’, ‘सन ऑफ सत्यमूर्ति’, ‘गरम’, ‘इधू नम्मा आलू’ यांसारख्या अनेक दाक्षिणात्य चित्रपटातही काम केले आहे.
हेही वाचा-