Thursday, April 24, 2025
Home भोजपूरी जाणून घ्या खेसारी लाल यादवच्या ‘दो घूंट’ गाण्यातील अभिनेत्रीबद्दल, जिने तिच्या बोल्ड आणि मादक अदांनी लावली सगळीकडेच आग

जाणून घ्या खेसारी लाल यादवच्या ‘दो घूंट’ गाण्यातील अभिनेत्रीबद्दल, जिने तिच्या बोल्ड आणि मादक अदांनी लावली सगळीकडेच आग

खेसारी लाल यादव भोजपुरी मनोरंजनविश्वातील सुपरस्टार. आपल्या गाण्यांसाठी ओळखला जाणारा खेसारी सतत त्याच्या वेगवेगळ्या गाण्यांमुळे चर्चेत असतो. त्याचे कोणतेही गाणे प्रदर्शित झाले की, लगेच इंटरनेटवर तुफान व्हायरल होते. त्याच्या गाण्यांमुळे खेसारी लगेच लाइमलाईटमध्ये येतो. सध्या खेसारीचे नवीन ‘दो घूंट’ गाणे तुफान गाजताना दिसत आहे. नुकतेच त्याचे ‘दो घूंट’ हे गाणे प्रदर्शित झाले आणि लगेचच इंटरनेटवर व्हायरल देखील झाले आहे. हे गाणे गाजण्याचे आणि चर्चेत येण्याचे दोन मुख्य कारण आहे, एक म्हणजे खेसारी लाल यादव आणि दुसरे कारण म्हणजे या गाण्यात खेसारी लालच्या सोबत दिसणारी अभिनेत्री.

‘दो घूंट’ गाण्यात असलेल्या अभिनेत्रीने तिच्या मादक अदांनी आणि सौंदर्याने सर्वांनाच मोहिनी घातली आहे. हे गाणे प्रदर्शित झाल्यापासूनच या अभिनेत्रीची तुफान चर्चा सोशल मीडियावर रंगताना दिसत आहे. सगळीकडे एकच प्रश्न विचारला जात आहे की, ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? चला तर जाणून घेऊया या अभिनेत्रीबद्दल. ‘दो घूंट’ गाण्यात आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांचेच लक्षवेधून घेणाऱ्या या अभिनेत्रीचे नाव आहे नम्रता मल्ल्या. सोशल मीडियावर तुफान सक्रिय असणाऱ्या नम्रताचे मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स असून ती सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.

खेसारी लाल यादव आणि नम्रता मल्ल्या यांचे ‘दो घूंट’ हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर काही तासातच गाण्याला १८ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहे. शिवाय हे गाणे यूटुबवर देखील ट्रेंडिंगमध्ये आले आहे. या गाण्यात सर्वांनाच आपल्या बिनधास्त अदांनी वेड लावणारी नम्रता एक मॉडेलसोबतच उत्तम डान्सर देखील असून, ती बेली डान्सिंगसाठी ओळखली जाते.

खेसारी लाल यादवच्या सोबत दिसणाऱ्या या अभिनेत्री गाण्यात दाखवलेल्या खतरनाक लूकला आणि डान्सला पाहून नेटकाऱ्यानी तिच्याबद्दल कमेंट्स करण्याचाच सपाटा लावला आहे. काही युझरने तिला ‘कोहिनुर’ देखील म्हटले आहे. यासोबतच फॅन्स खेसारी लालचे देखील खूप कौतुक करताना दिसत आहे. खेसारी गाणे गातो आणि प्रेक्षकांचे मनं जिंकत भोजपुरीमध्ये हाहाकार माजवतो.

खेसारी लाल यादवचे हे ‘दो घूंट’ गाणे ‘मुझे भी पिला दे शराबी’चे भोजपुरी व्हर्जन आहे. या गाण्याला २०२२ या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच प्रदर्शित कऱण्यात आले होते. एका माहितीनुसार खेसारी लाला यादव हा नम्रता मल्ल्यासोबत अजून अनेक प्रोजेक्टमध्ये सोबत दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा