अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) ही बॉलिवूडमधील लाइमलाईटमध्ये असणारी जोडी आहे. मलायका आणि अर्जुन हे दोघं त्यांच्या व्यावसायिक आयुष्यापेक्षा जास्त वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतात. मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करणाऱ्या अर्जुन आणि मलायका यांनी त्यांच्या या नात्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. नेहमीच हे दोघे कपल गोल्स सेट करताना दिसतात. अनेकदा विविध व्हिडिओ, फोटोंमधून आपल्याला पाहायला मिळते की, अर्जुन मलायकाला घेऊन खूपच प्रोटेक्टिव्ह आहे. याचमुळे त्याला बेस्ट बॉयफ्रेंड म्हणून देखील ओळखले जाते.
अर्जुन आणि मलायका सतत त्यांचे रोमॅंटिक, व्हॅकेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अर्जुन आणि मलायका यांचे ब्रेकअप झाल्याच्या तुफान चर्चा मीडियामध्ये गाजल्या. जवळपास चार वर्ष एकमेकांना डेट करणारी ही लोकप्रिय आणि प्रसिद्ध जोडी वेगळी झाल्याच्या बातम्या नाही अफवा खूपच उडाल्या. या सर्व बातम्या पाहून खुद्द अर्जुन कपूरने सोशल मीडियावर ते एकत्र असून त्यांच्यात ब्रेकअप झाले नसल्याचे सांगत सर्व बातम्यांना केवळ अफवा सांगितले होते.
त्यानंतर नुकतीच मलायकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘चाळीशीत प्रेम मिळणं ही सामान्य गोष्ट असल्याचे’ पोस्टमध्ये लिहिले होते. मलायकाने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “वयाच्या चाळीशीत प्रेम करणे या गोष्टीला आपण सामान्य गोष्ट असा करार दिला पाहिजे. ही गोष्ट खूपच सामान्य आहे. ३० वय झाल्यानंतर नव्या गोष्टी शोधल्या पाहिजे. ५० व्या वर्षी नवीन गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे. आपले आयुष्य २५ व्या वर्षी संपवणे योग्य नाही. असे विचार करणे बंद करा.’ असे तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले होते.
मलायकाच्या या पोस्टची सोशल मीडियावर खूपच चर्चा झाली. मलायकाने या पोस्टनंतर तिचे काही बोल्ड आणि आकर्षक फोटो देखील शेअर केले. या फोटोंमध्ये तिने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला नियॉन ग्रीन कलरचा ड्रेस घातला असून, या फोटोंमध्ये ती जबरदस्त मादक आणि बोल्ड दिसत आहे.
हेही वाचा :