Friday, December 13, 2024
[aioseo_breadcrumbs]

कोण आहे ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधील समीरचा सख्खा भाऊ? ‘या’ मालिकेत दिसणार मुख्य भुमिकेत

सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडत आहे. ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. मालिकेची कथा आणि त्यातील पात्रांच्या उत्तम अभिनय यामुळे प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडत आहे. यात समीरची भूमिका प्रसिद्ध अभिनेता संकर्षण कऱ्हाडे (Sankarshan Karhade) साकारतोय. त्याची ही भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. तसेच त्यातील यश आणि समीरच्या मैत्रीलाही खूपच दाद मिळत आहे.

पण तुम्हाला हे माहीत आहे का, की संकर्षण कऱ्हाडेचा भाऊ अधोक्षज कऱ्हाडे हा सुद्धा एक अभिनेता आहे आणि तो देखील लवकरच एका मालिकेत दिसणारं आहे. या सर्वाची माहिती त्याने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. स्टार प्रवाहावर सुरू होणारी नवी मालिका ‘पिंकीचा विजय असो’मध्ये तो बंटी नावची हटके आणि दमदार भूमिका बजावणार आहे. येत्या ३१ जानेवारी पासून रात्री ११ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहीले, “जसा पेहराव भूमिका पण अगदी तशीच! एकदम कलरफुल ‘बंटी’ नवी मालिका ,नवी भूमिका, नव आवाहन! पिंकिचा विजय असो!”

अधोक्षज कऱ्हाडे लहानपणापासून नाटकांमध्ये काम करत होता. तो झी मराठीवरील ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या रियालिटी शोमध्ये सहभागी झाला होता. त्यामधून त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यांनतर तो ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेत दिसला. ‘शांतता’, ‘कोर्ट सुरू आहे’ अशी अनेक नाटकं त्याने केली आहेत. आत्ता तो स्टार प्रवाहवरील ‘पींकीचा विजय असो’ या मालिकेत दिसणार आहे. या मालिकेत त्याचासोबत अमिता खोपकर, पियूष, अंकिता जोशी, कल्याणी जाधव, मुकेश जाधव, सुनील तावडे असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा