×

‘बिग बॉस १५’ फिनालेमध्ये सिद्धार्थ शुक्लाची दिसणार झलक, शहनाझ गिल देणार श्रद्धांजली, व्हिडिओ पाहताच चाहत्यांचे पाणावले डोळे

एकेकाळी मनोरंजन विश्वात चमकणारा चेहरा असलेला सिद्धार्थ शुक्ला आता फक्त आठवणीच राहिला आहे. सिद्धार्थचे २ सप्टेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाले. त्याच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. सिद्धार्थने आपल्या अभिनयाने आणि मनमोहकतेने चाहत्यांची मने जिंकली होती. पण असे काहीही न बोलता तो निघून जाईल याची कल्पनाही कोणाला नव्हती. ‘बिग बॉस १३’ जिंकून सिद्धार्थ शुक्लाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले. आज तो आपल्यासोबत नाही, पण त्याच्या आठवणी इतक्या आहेत की, आजही त्याच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन चाहते भावूक होतात. सलमान खानचा शो ‘बिग बॉस १५’मध्ये पुन्हा एकदा सिद्धार्थची झलक पाहायला मिळणार आहे. शोच्या फिनालेमध्ये, सिडची खास मैत्रिण शहनाझ गिल त्याला प्रेमाने सलाम द्यायला येईल. चॅनलने शोचा एक प्रोमो शेअर केला आहे, जो पाहिल्यानंतर चाहते भावुक होत आहेत.

‘बिग बॉस १५’मध्ये सिद्धार्थ शुक्लाची येणार आठवण

‘बिग बॉस १५’चा ग्रँड फिनाले आता जवळ आला आहे. शोचा शेवटचा भाग खास बनवण्यासाठी तयारी जोरात सुरू आहे. या शोमध्ये पुन्हा एकदा ‘सिडनाझ’च्या जोडीची झलक पाहायला मिळणार आहे. यावेळी शोमध्ये ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये सिद्धार्थचे (Sidharth Shukla) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. आता बिग बॉसला त्याचा खरा हिरो आठवेल. यावेळी सिद्धार्थची खास मैत्रीण शहनाझही (Shahnaz Gill) उपस्थित राहणार आहे.

‘सिडनाझ’च्या सोनेरी क्षणांची एक झलक

कलर्सने आपल्या इंस्टाग्राम पेजवर शोचा प्रोमो व्हिडिओ शेअर केला आहे. या प्रोमो व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आणि शहनाझचे काही व्हिज्युअल दाखवण्यात आले आहेत. जे या दोघांनी बिग बॉसच्या घरात घालवलेल्या सोनेरी क्षणांची आठवण करून देतात.

 #SidNaaz सह ग्रँड फिनाले असणार खास

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, “शहनाझ गिल जेव्हा येईल तेव्हा ग्रँड फिनाले आणखी खास असेल #SidNaaz च्या नात्याला मनापासून श्रद्धांजली. २९ आणि ३० जानेवारी रोजी रात्री ८ वाजता बिग बॉस १५ चा ग्रँड फिनाले पाहायला विसरू नका.”

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

 

चाहते होत आहेत भावुक

व्हिडिओ पाहून चाहते भावुक होत आहेत. चाहते ‘बिग बॉस १३’चे ते दिवस आठवत आहेत, जेव्हा दोघे एकत्र प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे. सिद्धार्थच्या शेवटच्या प्रवासात दिसलेला शहनाझचा उदास चेहराही चाहते विसरू शकत नाहीत.

हेही वाचा :

 

Latest Post