Saturday, August 2, 2025
Home बॉलीवूड अमिताभ बच्चन यांनी थ्रोबॅक फोटो शेअर करत फॅन्सला विचारला प्रश्न? कमेंट्स पाहून हसणे थांबवणे झाले मुश्किल

अमिताभ बच्चन यांनी थ्रोबॅक फोटो शेअर करत फॅन्सला विचारला प्रश्न? कमेंट्स पाहून हसणे थांबवणे झाले मुश्किल

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे नेहमीच त्यांच्या विविध चित्रपटांमुळे, टीव्ही कार्यक्रमांमुळे चर्चेत असतात. जवळपास ८० वर्षाचे असलेल्या मिस्टर बच्चन यांचा या वयातही कामाबद्दल असणारा उत्साह, निष्ठा त्यांना नेहमीच इतर कलाकारांपेक्षा वेगळे बनवते. आजही त्यांचे व्यक्तिमत्व आजच्या पिढीला आकर्षित करताना दिसते. अमिताभ नेहमीच काळाच्यासोबत चालताना दिसतात. आजच्या काळात सोशल मीडियाची गरज आणि या माध्यमाची व्याप्ती जाणून त्यांनी सोशल मीडियावर पदार्पण केले. बॉलिवूडमधील सर्वात जास्त सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी अमिताभ बच्चन एक आहे.

अमिताभ बच्चन नेहमीच त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सच्या संपर्कात राहताना दिसतात. ते नेहमीच सोशल मीडियावरून त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल फॅन्सला माहिती देत असतात. नुकताच अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांचा एक थ्रो बॅक फोटो शेअर केला असून, हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अमिताभ यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांनी एक गाऊन घातलेला दिसत आहे. त्यांच्या गाऊनची दोरी कोणीतरी धरून ठेवण्याचे देखील या फोटोमध्ये दिसत आहे.

या फोटोमध्ये अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावरील हावभाव खूपच वेगळे आणि विचित्र दिसत आहे. अमिताभ यांनी हा फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “सांगा हा हात कोणाचा आहे?” त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी भरपूर कमेंट्स आल्या असून, त्यांनी हात नक्की कोणाचा असावा याबाबत अनेक कयास लावले आहे.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिले, “रेखा मॅडमचा हात आहे”, अजून एकाने लिहिले, “सांगू शकत नाही”, एका मजेशीर पद्धतीने लिहिले, “कायद्याचा हात आहे”, एकाने सांगितले की, “स्मिता पाटील यांचा हात आहे.”, अजून एकाने लिहिले, “धर्मेंद्र यांचा हात आहे.” तर अजून एकाने तो हात अमिताभ बच्चन यांच्या एक्स गर्लफ्रेंडचा असल्याचे सांगितले आहे. मात्र नक्की हा हात कुणाचा आहे याबद्दल बिग बी यांनी खुलासा केला नाही. अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर ते लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये दिसणार असून, त्यांच्यासोबत या सिनेमात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा