Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

मीना कुमारीच्या जागी ‘पाकिजा’ चित्रपटात निर्मात्यांनी वापरली होती डबल बॉडी, चित्रपटातील ‘या’ सीनमध्ये नव्हती अभिनेत्री

हिंदी सिनेसृष्टीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या अभिनयाने चित्रपटसृष्टीला एक वेगळे वैभव प्राप्त करुन दिले होते. यामधे सर्वप्रथम नाव घेतले जाते ते म्हणजे अभिनेत्री मीना कुमारीचे. अभिनेत्री मीना कुमारीने आपल्या अभिनयाने या क्षेत्रात यशाचे शिखर गाठले होते. मात्र त्यांच्या शेवटच्या चित्रपटाची कथा खूपच रंजक आहे तीच आज पाहणर आहोत.

हिंदी चित्रपटक्षेत्राची सुंदर अभिनेत्री म्हणून मीना कुमारीच्या (meena kumari) नावाचा उल्लेख केला जातो. मीना कुमारीने 80च्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांना मोहिनी घातली होती. त्याचबरोबर मीना कुमारीचा ‘पाकीजा’ चित्रपट त्या काळात जोरदार गाजला होता. आजही या चित्रपटाची चर्चा होत असते. या चित्रपटाची कथा जितकी सुंदर आहे तितकीच या चित्रपटाची निर्मिती ही मजेशीर आहे. कारण या चित्रपटाला तयार करण्यासाठी तब्बल 14 वर्ष लागली होती.

‘पाकीजा’ चित्रपटाने मीना कुमारीला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. हा चित्रपट तिच्या यशात मैलाचा दगड ठरला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक कमाल अमरोही मीना कुमारीचे पती होते. या चित्रपटासाठी मीना कुमारीसोबत कमाल यांनी अभिनेते धर्मेंद्र यांची निवड केली होती. मात्र या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान धर्मेंद्र आणि मीना कुमारी यांच्यात प्रेम प्रकरणाची चर्चा सुरू झाली. त्यामुळे संतापलेल्या कमाल यांनी धर्मेंद्र यांना या चित्रपटातून काढून टाकले. यावेळी मीना कुमारी खूप नाराज झाल्या होत्या ज्यामुळे या चित्रपटाचे शूटिंग थांबविण्यात आले. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट काळात तयार होता होता प्रदर्शित होईपर्यंत रंगीत पडद्यांचा शोध लागला होता. दुसर्‍यांदा चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले त्यावेळी रंगीत चित्रपटांचा शोध लागला होता. मात्र यावेळी ही मीना कुमारी आणि कमाल यांच्यात वाद होऊन थेट त्यांचा घटस्फोट झाला ज्यामुळे पुन्हा एकदा शूटिंग थांबविण्यात आले.

मीना कुमारी आणि कमाल यांचा घटस्फोट झाल्यानंतर हा चित्रपट अर्धवटच राहीला. मात्र त्यावेळी सुनील दत्त आणि नर्गीसने त्यांना समजावत हा चित्रपट लोकांसमोर आणण्याचे आवाहन केले. यामुळे चित्रपटाचे पुन्हा शूटिंग सुरू झाले. मात्र मीना कुमारी सतत आजारी राहू लागल्या. चित्रपटातील एका सीनमध्ये राज कुमार जेव्हा मीना कुमारीच्या सौंदर्याचे कौतुक करतात त्यावेळी त्या झोपलेल्या असतात. या सीनमध्ये मीना कुमारी नसून त्यांचा डबल रोल शूट करण्यात आला होता. त्याचबरोबर चित्रपटातील डान्समध्येही त्यांच्या डबल रोलचा वापर करण्यात आला होता.

हा चित्रपट अनंत अडचणींवर मात करत पडद्यावर प्रदर्शित झाला मात्र अवघ्या दोन महिन्यात मीना कुमारीचे निधन झाले. या चित्रपटाला मात्र प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला.(interesting story of meena kumari last movie pakeezah)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांचा झाला ‘रहस्यमयी’ मृत्यू घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला होता मृतदेह

‘आदिपुरुषला बॉयकॉट करा’ म्हणत नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरील ‘त्या’ चुकीवर घेतला आक्षेप

हे देखील वाचा