Thursday, October 30, 2025
Home बॉलीवूड मल्लिका शेरावतने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, बिकिनी घातली आणि त्यातच तिने…

मल्लिका शेरावतने तोडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, बिकिनी घातली आणि त्यातच तिने…

हिंदी चित्रपटसृष्टीची हॉटनेसची क्वीन म्हणून अभिनेत्री मल्लिका शेरावत (Mallika Sherawat) नेहमीच चर्चेत असते. आपल्या बोल्ड फोटोंमुळे ती सोशल मीडियावर नेहमीच चाहत्यांना फिदा करत असते. आता मल्लिकाचा सोशल मीडियावरील एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तिने हॉटनेसचा जोरदार तडका दिला आहे.

अभिनेत्री मल्लिका शेरावत सध्या चित्रपटात फारशी दिसत नसली, तरी सोशल मीडियावर मात्र सतत सक्रिय असते. आपले अनेक बोल्ड फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिच्या मादक आणि घायाळ करणार्‍या सौंदर्याची आजही जोरदार चर्चा सुरू असते. आता मल्लिकाने आपला आणखी एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, ज्यामध्ये तिने बोल्डनेसच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. हा एक योगा व्हिडिओ असून मल्लिका त्यामध्ये योगा करताना दिसत आहे. मात्र योगा करताना तिने घातलेल्या कपड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

अभिनेत्री मल्लिका आपल्या फिटनेसची खूपच काळजी घेते. या व्हिडिओमध्येही ती हॉट योगा करताना दिसत आहे. या व्हिडिओत तिने घातलेल्या बिकिनीमूळे ती खूपच मादक दिसत आहे. तिच्या या व्हिडिओने चाहत्यांना क्लिन बोल्ड केले असून, यावर अनेकांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये मल्लिकाचे चाहते तिचे जोरदार कौतुक करताना दिसत आहेत. या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका चाहत्याने “सुपर हॉट मॅडम” अशी कमेन्ट केली आहे, तर दुसर्‍या एका युजरने “खूप छान योगा पोज आहे” अशी भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. मल्लिकाचा हा व्हिडिओ मात्र सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

दरम्यान मल्लिका शेरावतने अनेक गाजलेल्या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. मागच्या वर्षी ती ‘बू सबकी फटेगी’ या कॉमेडी चित्रपटात झळकली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामाजीने केले होते. आता मल्लिका लवकरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत झळकणार असून ती ‘नागमती’ चित्रपटात काम करणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा