Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड ‘या’ फिल्म निर्मात्याने आदित्य पांचोली विरोधात पोलिसात केली तक्रार दाखल, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

‘या’ फिल्म निर्मात्याने आदित्य पांचोली विरोधात पोलिसात केली तक्रार दाखल, जाणून घ्या पूर्ण प्रकरण

आदित्य पांचोलीने बॉलिवूडमध्ये त्याच्या अभिनयाने आणि दमदार लूकने प्रेक्षकांचे अनेक काळ मनोरंजन केले. मात्र आदित्य जेवढा त्याच्या कामासाठी गाजला त्यापेक्षा अधिक प्रसिद्धी त्याला त्याच्या वादांमुळे मिळाली. आदित्य आतापर्यंत अनेक वादांमध्ये अडकला असून, नेहमीच तो त्याच्या वादांमुळे मीडियामध्ये गाजतो. आता पुन्हा एकदा आदित्य एका वादात अडकला आहे. फिल्म निर्माता सॅम फर्नांडिसने मुंबईच्या जुहू पोलीस स्टेशनमध्ये आदित्य पांचोली विरोधात एक तक्रार दाखल केली आहे.

आदित्यने सॅमला एका हॉटेलमध्ये शिवीगाळ करणे, धमकावणे आणि मारपीट केल्याची तक्रार दाखल केली आहे. तर आदित्य पांचोलीने देखील त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. सध्या पोलीस या तक्रारीची चौकशी करत असून, अधिक माहिती अजून मिळाली नाही. आदित्य पंचोली आणि जरीना वहाबने दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आईविरोधात २०२० साली बॉम्बे हायकोर्टात शरण घेतली. या दोघांनी राबिया खान यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करत राबियाला त्यांच्या विरोधात मानहानी करणारी विधाने थांबवण्याची मागणी केली होती.

aditya pancholi

राबिया खानने २०११ ते २०१५ या वर्षांमध्ये बॉम्बे हाय कोर्टात तीन वेळा पांचोली कुटुंबाविरोधात अपमानजनक विधाने न करण्याचा आदेश दिला होता. २०१७ साली राबिया खानने बॉम्बे हाय कोर्टात स्वतः जात कोणतेही प्रेस रिलिझ जारी न करता आणि मुलाखत ना देण्याची मागणी केली. पांचोली कुटुंबाचे वकील असलेल्या प्रशांत पाटील यांच्याकडून हायकोर्टात ही याचिका दाखल झाली. यात त्यांनी अनेक यूट्यूब चॅनेलच्या लिंक आणि संबंधित बातम्यांची कात्रणे, सोशल मीडियाच्या पोस्ट सामील आहेत. याचिकेत हे देखील सांगितले गेले की, राबिया खानने ट्विटरवर फाईट फॉर जिया नावाने एक अकाऊंट सुरु केले ज्याचे २२ हजर फॉलोवर्स असून, यात आपत्तीजनक ट्विट केले जात असल्याचे त्यांनी सांगितले होते.

जिया खान ही बॉलिवूडमधील उभरती अभिनेत्री होती. तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘निशब्द’, आमिर खानसोबत ‘गजनी’, अक्षय कुमारसोबत ‘हाऊसफुल’ सिनेमात काम केले होते. जिया २०१३ साली तिच्या घरी पंख्याला लाटलेल्या अवस्थेत आढळली होती. सीबीआयने त्यांच्या रिपोर्टमध्ये आत्महत्या सांगतले होते, मात्र तिच्या आईने राबिया खानने खून झाल्याचे सांगितले होते. या प्रकरणात आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज आणि जिया एकमेकांना डेट करत होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा