Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड ‘डान्स मेरी रानी’ गाण्यावर डान्स करताना जिनिलियाने केली रितेश देखमुखला मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

‘डान्स मेरी रानी’ गाण्यावर डान्स करताना जिनिलियाने केली रितेश देखमुखला मारहाण, व्हिडिओ झाला व्हायरल

बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे बॉलिवूडमधील सर्वात मोहक आणि रोमँटिक जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात आणि अनेकदा त्यांचे मजेदार रील शेअर करतात. अशात दाेघेही हॅपनिंग लाइफची ओळख करून देताना दिसत आहे.

जिनिलियाने (Genelia Deshmukh) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये जिनिलिया आणि रितेश (Riteish Deshmukh) दोघेही नोरा फतेहीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डान्स मेरी रानी’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. दोघेही गाण्यावर आनंदाने डान्स करत असताना अचानक जिनिलिया मध्येच थांबते आणि रितेशला मारू लागते. तरीही रितेश थांबून पुन्हा नाचू लागतो आणि जिनेलिया त्याला पुन्हा मारते.

या फनी डान्स व्हिडिओमध्ये दोघांचे बॉन्डिंग चाहत्यांना खूप आवडले आहे. हा व्हिडिओ शेअर करत जिनिलियाने लिहिले की, “20 हा फक्त एक आकडा आहे. तुम्हाला कधीही न संपणाऱ्या प्रवासाला जायचे आहे.” रितेश आणि जिनिलियाने ‘मुझे तेरी कसम’ (2003) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि येथूनच दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. 9 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 2012 मध्ये लग्न केले. (actor iteish deshmukh genelia deshmukh dance video on naach naach naach went viral on social media)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘या गोष्टी खूप विचित्र आहेत’, विवेक ओबेरॉयबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर सलमानने दिले होते उत्तर

धक्कादायक! दाक्षिणात्य लेडी सुपरस्टार असणाऱ्या नयनताराने देखील घेतला होता कास्टिंग काऊचचा विदारक अनुभव

हे देखील वाचा