हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक बप्पी लहिरी यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. बप्पी लहिरी हे सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक होते. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील अनमोल व्यक्तिमत्व हरवले आहे अशीच प्रत्येकजण भावना व्यक्त करत आहे.
बप्पी लहिरी हे हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गायक होते. त्यांच्या गाण्याचे, आवाजाचे असंख्य चाहते आहेत या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बप्पी दा त्यांच्या गाण्यांइतकेच अनेक वादामुळे सुद्धा चर्चेत होते. असाच एक किस्सा त्यांनी अभिनेता अजय देवगण याच्या चित्रपटाविरोधात गुन्हा नोंद केल्याने घडला होता. २०१०मध्ये आलेल्या ‘टूनपुर का सुपरहीरो’ या चित्रपटाविषयीचा हा वाद आहे. या चित्रपटात अभिनेता अजय देवगण, काजोल आणि डेलनाज इराणी यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाविरोधात बप्पी लहिरी यांनी नोटिस पाठवली होती. याच कारण म्हणजे चित्रपटातील एका भूमिकेला गप्पी असे नाव दिले होते यावर त्यांनी आक्षेप घेतला होता त्याचबरोबर त्यांनी हे मात्र माझ्यासारखे दिसते असा ही दावा केला होता.
हाच मुद्दा पकडून बप्पी दांनी एका समितीमार्फत कोर्टात नोटिस पाठवली होती. यामध्ये “टूनपुर का सुपरहीरो चित्रपटात गप्पी हे नाव वापरले असून यामध्ये दाखविण्यात आलेले पात्र हुबेहुब बप्पीदा सारखे आहे. यामधून बप्पी लहिरी यांच्या नावाचा आणि प्रतिष्ठेचा वापर चित्रपटात करण्यात येत असून त्यामधून आमच्या प्रतिमेला धक्का पोहचत असल्याचा खुलासा केला होता”. या संपूर्ण प्रकरणावर चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी स्पष्टीकरण देताना” आम्ही बप्पी लहिरी यांचा नेहमीच आदर करत असून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असे कोणतेही काम आम्ही केले नाही. पाहिजे तर चित्रपट दाखवतो असे म्हंटले होते.या तक्रारीमुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले होते. बप्पी लहिरी यांनी अशा वादात पडण्याची ही पहिलीच वेळ होती. बप्पी लहिरी हे अत्यंत शांत स्वभावाचे व्यक्ति होते. मात्र त्यांचा हा वाद चांगलाच गाजला होता.