Friday, January 16, 2026
Home मराठी प्राजक्ता माळीने केलेल्या पँराग्लायडिंगचा थरार पाहिलाय का? पाहा हिमाचलमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्या प्राजक्ताने केलेली धमाल

प्राजक्ता माळीने केलेल्या पँराग्लायडिंगचा थरार पाहिलाय का? पाहा हिमाचलमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटणाऱ्या प्राजक्ताने केलेली धमाल

नवीन वर्ष सुरु झाले आणि सरकारने चालू केल्या हळू हळू अनलॉक सुरु केले. अनलॉकच्या अंतर्गत अनेक गोष्टी चालू केल्या आहेत. त्यात पर्यटनाचा देखील समावेश आहे. पर्यटन चालू झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाची लहर आली. दहा महिने घराच्या चौकटीत बंद राहिल्यानंतर पर्यटनाच्या निमित्ताने अनेक नागरिक आता घरातून बाहेर पडत आहे. याला कलाकार देखील अपवाद नाही. अनेक कलाकार आता देश-परदेशात फिरायला जात असून, त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करतात.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळीसुद्धा तिच्या कामाच्या व्यापातून वेळ काढत परिवारसोबत हिमाचल प्रदेशात सुट्ट्यासाठी पोहचली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एअरपोर्टवरचा एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले, ” आजूबाजूचे जवळपास सगळेच एक तर लग्न करतायेत नाहीतर उत्तरेला फिरायला जातायेत…म्हटलं आपणही जे सहज शक्य आहे ते करूया…”

प्राजक्ता सध्या हिमाचल प्रदेशमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत असून, तिथे ती विविध निसर्गरम्य ठिकाणांना भेटी देत आहे. यातच तिने पँराग्लायडिंगचाही अनुभव घेतला. याचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये पहिल्यांदाच पँराग्लायडिंगचा थरार अनुभवताना प्राजक्ता खूपच उत्साही दिसत आहे.

या सुट्यांचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून, त्या फोटोना फॅन्सकडून खूप लाइक्स आणि कमेंट्स मिळत आहे.

शूटिंगच्या कामात व्यस्त असल्याने प्राजक्ता घरच्यांना जास्त वेळ देऊ शकत नाही, मात्र या सुट्यांच्या निमित्ताने ती तिच्या परिवारसोबत खूप चांगला वेळ घालवताना दिसत आहे.

तिथल्या वेगवगेळ्या पदार्थांवर देखील ती ताव मारताना दिसत आहे.

हिमाचल प्रदेशला निसर्गाने सुंदरतेचे भरभरून वरदान दिले आहे. प्राजक्ता हाच निसर्ग मनापासून अनुभवताना आणि डोळ्यात साठवताना दिसत आहे.

प्राजक्ताने अभिनयसोबतच, डान्स, सूत्रसंचालन अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. लवकरच ती लॉकडाऊन सिनेमात दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

डायरेक्टरने प्रियांका चोप्राला दिला होता सर्जरी करून फिगर ठीक करण्याचा सल्ला; अभिनेत्रीने आपल्या पुस्तकात केला धक्कादायक खुलासा

वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

सुंदरता असावी तर अशी! जब्याच्या शालूने शेअर केले भन्नाट फोटो, पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

 

 

हे देखील वाचा