वाढदिवस विशेष! इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून कुमार विश्वास बनले ‘कवी’, ‘चाय गरम’ चित्रपटात केला होता अभिनय

TV Actor Kumar Vishwas Is Celebrating His 5th Birthday Today


सध्या प्रेमाचा आठवडा म्हणजेच व्हॅलेंटाईन आठवड्याला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात अनेक कलाकार आपला वाढदिवस साजरा करत आहेत. यामध्ये प्रसिद्ध हिंदी कवी आणि राजकीय नेता कुमार विश्वास यांचाही समावेश आहे. विश्वास आज आपला ५१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १९७० रोजी उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जनपदच्या पिलखुआमध्ये झाला होता. त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आज आपण त्यांच्या कारकीर्दीविषयी जाणून घेणार आहोत.

इंजिनियरिंगचे शिक्षण सोडून बनले कवी
कवी विश्वास यांच्या वडिलांचे नाव डॉ. चंद्रपाल शर्मा असून ते आरएसएस डिग्री कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. आणि त्यांच्या आईचे नाव हे रमा शर्मा आहे. विश्वास आपल्या चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहेत. कुमार विश्वास यांच्या वडिलांना वाटायचे की त्यांनी इंजिनियर व्हावे. परंतु विश्वास यांचे स्वप्न वेगळे काहीतरी करण्याचे होते. त्यांनी इंजिनियरिंगचे शिक्षण मध्येच सोडून दिले होते आणि हिंदी साहित्यात पदवी घेतली. एमए केल्यानंतर त्यांनी ‘कौरवी लोकगीतों में लोकचेतना’ या विषयात पीएचडी केली होती. कुमार विश्वास यांनी १९९४ मध्ये राजस्थानच्या एका कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली होती.

त्यांनी कवी संमेलनांमध्येही भाग घेतला आहे. सोबतच ते मॅगझिनसाठीही लिहितात. त्यांनी आदित्य दत्त यांच्या ‘चाय गरम’ चित्रपटात अभिनयही केला आहे. त्यांचे दोन काव्य- संग्रह ‘एक पगली लडकी के बिन’ आणि ‘कोई दीवाना कहता है’ हे प्रकाशित झाले आहे.

पिढीचा सर्वाधिक संभाव्य कवी- धर्मवीर भारती
प्रसिद्ध लेखक धर्मवीर भारती यांनी कुमार विश्वास यांना आपल्या पिढीचा सर्वाधिक संभाव्य कवी म्हटले होते. दुसरीकडे प्रसिद्ध हिंदी गीतकार नीरज यांनी विश्वास यांना ‘निशा- नियाम’ची उपाधि दिली होती.

राजकारणात मतभेद झाल्याने निवडली वेगळी वाट
कुमार विश्वास सन २०११ मध्ये जनलोकपाल आंदोलनातही सहभागी झाले होते. त्यांनी सन २०१४ मध्ये अमेठीमधून राहुल गांधी आणि स्म्रिती इराणी यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्यात त्यांना अपयश आले.

ते केवळ आपल्या कवितांसाठीच नाही, तर आपल्या राजकीय क्षेत्रातील कामांसाठीही चर्चेचा विषय ठरले आहेत. त्यांनी आम आदमी पार्टीसोबत आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर मतभेद वाढल्यामुळे त्यांनी आपली वेगळी वाट निवडली होती. सध्या ते राजकारणामधून वेगळे झाले आहेत. ते म्हणतात की, राजकारण आणि भ्रष्टाचार यांचा घनिष्ट संबंध आहे.

बोथट वक्तव्यासाठी प्रसिद्ध
कुमार विश्वास हे त्यांच्या बोथट वक्तव्यासाठी देखील ओळखले जातात. एकदा त्यांनी नेत्यांबद्दल बोलताना म्हटले होते की, पूर्ण-वेळेच्या नेत्यांप्रमाणे, मी चमचे बनवत नाही किंवा इतरांच्या खर्चाने प्रवास करत नाही. मी माझा खर्च कवी परिषदेतून जमवतो आणि त्यातूनच खर्च करतो.

प्रसिद्ध कविता
‘कुछ छोटे सपनों के बदले’, ‘जब भी मुह ढक लेता हूँ’, ‘सूरज पर प्रतिबंध अनेको’, ‘जीवन में जब तुम थे नही’ या कुमार विश्वास यांच्या प्रसिद्ध कविता आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-आनंदाची बातमी! अभिनेत्री अनिता हसनंदानीने दिला मुलाला जन्म; पतीने शेअर केला फोटो
-कल्पनाचे ‘फूलौरी बिना चटनी’ गाणे झाले रिलीज, एकाच दिवसात मिळाले जबरदस्त व्ह्यूज
-हिट झालेल्या सिनेमाचे श्रेयही राजीव कपूर यांना मिळाले नाही, वडिल राज कपूर यांनीही दिली नव्हती साथ
-‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनीपासून ते करीना कपूरपर्यंत ‘या’ अभिनेत्रींनी केलंय विवाहित पुरुषांशी लग्न; वाचा कोणाकोणाचा आहे समावेश
-शूटिंगदरम्यान राजीव कपूर पडले होते पद्मिनी कोल्हापुरेच्या प्रेमात; राज कपूर यांनी धमकी दिल्यावर तुटले होते दोघांचे नाते


Leave A Reply

Your email address will not be published.